9 Seater Car: भारतीय वाहन बाजारांमध्ये किंवा वाहन क्षेत्रांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे खूप मोठे नाव असून अनेक व्यावसायिक वाहनांपासून तर शेती उपकरणे, ट्रॅक्टर, कार निर्मितीमध्ये ही कंपनी कायम पुढे आहे. अनेक नवनवीन प्रकारचे आणि वैशिष्ट्य असलेली वाहनाचे लॉन्चिंग महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून करण्यात येते.
भारतीय बाजारपेठेमध्ये आणि भारतीय ग्राहकांमध्ये देखील महिंद्रा कंपनीच्या वाहनांना खूप मोठी मागणी असते. अगदी याच पद्धतीने महिंद्रा कंपनीने आजपर्यंत ज्या काही कार बाजारामध्ये लॉन्च केलेले आहेत त्या देखील ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
महिंद्राची जर आपण बोलेरो या कारचा विचार केला तर ही काही वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आलेली होती व अगदी शेतकऱ्यांपासून तर व्हीआयपी लोकांपर्यंत या कारला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली होती व आता हीच कार महिंद्रा कंपनीने एका नव्या रूपात सादर केलेली आहे. सादर करण्यात आलेल्या नवीन बोलेरोचे नाव महिंद्रा बोलेरो नियो+ असून ही नुकतीच भारतात सादर करण्यात आली आहे.
महिंद्राने लॉंच केली Mahindra Bolero Neo+ कारची वैशिष्ट्ये?
ही एक सब कॉम्पॅक्ट बोलेरो न्यू एसयूव्ही असून ती तीन पंक्ती 9 सीटर एडिशन आहे. ही नवीन बोलेरो नियो+ बोलेरो नियोसारखीच दिसते. तर यामध्ये काही बदल करण्यात आलेले असून यामध्ये बदलाच्या अनुषंगाने बघितलं तर पुढच्या बंपरला सुधारित फॉग लॅम्प हाउसिंग आणि डिझाईन एलिमेंट सारखा बुलबार देण्यात आला आहे.
तसेच सोळा इंचाचा आलोय हिलचा नवीन सेट देण्यात आला आहे. या नवीन बोलेरोची लांबी ४४०० मीमी असून ती अगोदरच्या बोलेरो निओपेक्षा जवळपास 405 मीमी जास्त लांब आहे.
परंतु व्हीलबेस मात्र अगोदरच्या बोलेरो निओ सारखाच ठेवण्यात आलेला आहे. तसेच मागच्या बाजूला बॉडी पॅनल्स नवीन देण्यात आलेल्या आहेत व यात एक मोठा रियल कॉर्टर ग्लास आणि मोठे रॅप राऊंड टेल लॅम्प देण्यात आलेले आहेत.
कसे आहे या कारचे इंटेरियर?
जर आपण या नवीन बोलेरो कारचे इंटिरियर पाहिले तर ते अगोदरच्या बोलेरो निओ सारखेच आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. यात नवीन नऊ इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेन्ट सिस्टम असून नवीन स्टेरिंग व्हील आणि सुधारित इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अपडेट करण्यात आलेले आहे.
या कारचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तीन पंक्ती( लाईन) सेटअप असून त्यामध्ये दोन बाजूच्या सीट्स देखील आहेत. तसेच ब्लूटूथ यूएसबी कनेक्टिव्हिटी देखील यामध्ये देण्यात आलेली असून त्यासोबत इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल विंग मिरर,
एक उंची ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, सहा स्पीकर साऊंड सिस्टम, समोर आणि मागील पावर विंडो, मॅन्युअली एसी आणि फ्रंट सीट आर्मरेस्ट देखील देण्यात आलेला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेकरता या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी समाविष्ट करण्यात आलेली आहे.
कसे आहे बोलेरो निओ+ चे इंजिन?
या कारमध्ये स्कॉर्पिओ श्रेणीतील 2.2- लिटर mHawk डिझेल इंजिन देण्यात आले असून ते 120 एचपी पावर आणि 280 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच सहा स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
किती आहे महिंद्रा बोलेरो निओ+ ची किंमत?
या कारची सुरुवातीची किंमत 11 लाख 39 हजार रुपये( एक्स शोरूम ) ठेवण्यात आलेली आहे व ही किंमत एन्ट्री लेवल P4 ट्रीमसाठी आहे तर टॉप स्पेक P10 व्हेरी एंटची किंमत बारा लाख 49 हजार रुपये( एक्स शोरूम) ठेवण्यात आलेले आहे.