ACE DI 854 NG Tractor: ‘हे’ आहे 32 एचपी मधील पावरफूल मिनी ट्रॅक्टर! छोट्या शेतकऱ्यांना शेतीकामांमध्ये ठरेल वरदान, वाचा किंमत

Ajay Patil
Published:
ace di 854 ng tractor

ACE DI 854 NG Tractor:-ट्रॅक्टर आणि शेती यांचे नाते अनन्यसाधारण असून आत्ताच्या कालावधीमध्ये ट्रॅक्टर शिवाय शेती शक्यच नाही अशी स्थिती आहे. शेतीच्या प्रत्येक कामाकरिता आता ट्रॅक्टरचा वापर केला जातो व ट्रॅक्टरचलीत अनेक यंत्रे विकसित झाल्यामुळे अशा यंत्रांच्या वापराकरता देखील ट्रॅक्टर आवश्यक असते.

त्यामुळे आता बरेच शेतकरी ट्रॅक्टर खरेदी कडे वळताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु जर ट्रॅक्टरच्या बाबतीत विचार केला तर मोठ्या ट्रॅक्टरच्या किमती जास्त असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ते घेणे परवडत नाही.

म्हणून बाजारामध्ये अनेक कंपन्यांनी मिनी ट्रॅक्टर सादर केलेले आहेत. त्यामुळे अशा ट्रॅक्टरचा वापर करून छोट्यात छोटे शेतकरी देखील शेतीतील कठीण कामे अशा मिनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करू शकतात.

या अनुषंगाने आपण या लेखात  Ace कंपनीच्या एका ट्रॅक्टर बद्दल माहिती घेणार आहोत जे पावरफुल ट्रॅक्टर असून तुम्हाला जर अशाच ट्रॅक्टरची खरेदी करायची असेल तर तुम्ही Ace Di 854 NG ट्रॅक्टरची खरेदी करू शकतात.कारण हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या लेखामध्ये या ट्रॅक्टरची माहिती आपण घेऊ.

Ace DI 854 NG ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

 या ट्रॅक्टरमध्ये 2858 cc क्षमतेचे तीन सिलेंडर वॉटर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 32 एचपी पावर आणि 155 एनएम टॉर्क जनरेट करते. या ट्रॅक्टरमध्ये ड्राय इयर क्लीनर विथ कूलिंग सेन्सर प्रकारचे एअर फिल्टर देण्यात आले आहे.

या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 27.2 एचपी आहे आणि त्याचे इंजिन 1800 आरपीएम निर्माण करते.Ace कंपनीने हा ट्रॅक्टर 1960mm व्हिलबेसमध्ये 3650mm लांबी आणि 1700 एमएम रुंदी असलेला बनवला आहे.

या ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स 395 एमएम इतका आहे. तसेच मेकॅनिकल स्टेरिंग देण्यात आली असून आठ फॉरवर्ड+ दोन रिव्हर्स गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे.तसेच ड्राय टाइप सिंगल क्लच आहे. ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 2.29 ते 27.75

तर रिव्हर्स स्पीड 2.86 ते 11.31 किलोमीटर इतका आहे.या ट्रॅक्टरमध्ये ड्राय डिस्क ब्रेक्स/ ऑइल एमर्स ब्रेक्स देण्यात आलेले आहेत.

 किती आहे Ace Di 854 NG ट्रॅक्टर ची किंमत?

 या ट्रॅक्टरची भारतात एक्स शोरूम किंमत पाच लाख दहा हजार ते पाच लाख 45 हजार इतकी ठेवण्यात आली असून आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत काही राज्यांमध्ये बदलू शकते. तसेच कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरसाठी 2000 तास किंवा दोन वर्षाची वारंटी देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe