Best Petrol Scooter : ‘या’ आहेत भारतातील सर्वात पावरफुल आणि महाग पेट्रोल स्कूटर! वाचा त्यांची फीचर्स आणि किंमत

Ahmednagarlive24
Published:

Top Petrol Scooter:- भारतामध्ये ज्या प्रमाणामध्ये बाईकचा वापर केला जातो अगदी त्याच प्रमाणामध्ये स्कूटरचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर होतो. तसे पाहायला गेले तर अगोदर शहरी भागांमध्ये स्कूटरचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जायचा.

परंतु आता ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर स्कूटरचा वापर होऊ लागला आहे. भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये अनेक महत्त्वाच्या कंपन्यांच्या स्कूटर्स असून यामध्ये आता इलेक्ट्रिक स्कूटर देखील मोठ्या प्रमाणावर लॉन्च करण्यात आलेले आहेत. भारतीय स्कूटर बाजारपेठेमध्ये अनेक फीचर्स आणि वेगवेगळ्या किंमत असलेल्या स्कूटर उपलब्ध आहेत

व त्यामध्ये काही स्कूटर महाग तर आहेतच परंतु अधिक पावरफुल देखील आहेत. त्यामुळे या लेखात आपण अशाच काही टॉप पावरफुल पेट्रोल स्कूटरची माहिती या लेखात बघणार आहोत. या आहेत भारतातील पावरफूल पेट्रोल स्कूटर

1- यामाहा एरोक्स 155- भारतामधील ज्या काही सर्वात पावरफुल पेट्रोल स्कूटर आहेत त्यामध्ये यामाहा एरोक्स या स्कूटरचा दुसरा क्रमांक लागतो. या स्कूटर मधील इंजिन जर पाहिले तर ते व्हीव्हीए तंत्रज्ञान आणि इंधन इंजेक्शन सिस्टमसह सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित असून याची मोटर आठ हजार आरपीएम वर 14.75 बीएचपी आणि सहा हजार पाचशे आरपीएम वर 13.9 एनएमचा पिक टॉर्क जनरेट करते. तसेच या स्कूटरचा पावर प्लेट सीव्हीटी ऑटोमॅटिक गिअर बॉक्सशी जोडलेला आहे. या स्कूटरची इंधन टाकीची क्षमता साडेपाच लिटरची असून वजन 126 किलोग्रॅम आहे.

2- बीएमडब्ल्यू मोटरराड- बीएमडब्ल्यू मोटरराड आणि 2022 मध्ये सी 400 जिटी भारतात सादर केली आणि सर्वात शक्तिशाली आणि आतापर्यंतचे सर्वात महाग पेट्रोल स्कूटर म्हणून ही ओळखली जाते. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 11 लाख 25 हजार रुपये असून या स्कूटरमध्ये सिंगल सिलेंडर, लिक्विड कुल्ड इंजिन देण्यात आलेले असून जे ५७५० आरपीएम वर 35 nm चा पिक टॉर्क आणि 7000 आरपीएमवर ते 30.5 bhp ची कमाल आउटपुट देते. तसेच याची मोटर सीबीटी गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. याबाबत कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर 0-100 कीमी प्रतितास वेग 9.5 सेकंदात घेऊ शकते आणि 139 किमी प्रति तास वेग वाढवू शकते.

3- सुझुकी बर्गमन स्ट्रीट 125- सुझुकी बर्गमन स्ट्रीट 125 ही स्कूटर देखील एक पावरफुल स्कूटरच्या यादीत असून स्कूटर मध्ये 125cc इंजिन देण्यात आले आहे व ते 6750 आरपीएम वर 8.5 bhp आणि 5500 आरपीएम वर दहा एनएमचा पिक टॉर्क देते. ही एक जपानी मॅक्सी स्टाइल्स स्कूटर असून याची एक्स शोरूम किंमत 96 हजार 824 रुपये आहे. या स्कूटरचे वजन 111 किलो असून इंधन टाकी साडेपाच लिटरची आहे.

4- टीव्हीएस एनटॉर्क रेस एक्सपी- भारतात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या स्पोर्टी 125cc स्कूटर पैकी टीव्हीएसची एनटॉर्क रेस एक्सपी स्कूटर ही एक आहे. या स्कूटर मध्ये 125cc सिंगल सिलेंडर, इंधन इंजेक्टेड मोटरद्वारे समर्थित इंजिन असून या स्कूटरचे नियमित रूपे 9.3 बीएचपी आणि 10.5 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतात. तसेच एनटॉर्कच्या रेस आणि रेस एक्सपी ट्रीमला त्याच इंजिन मधून 10.06 बीएचपी आणि 10.8 एनएमचा टॉर्क मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe