EV Car Update: तुमचा देखील इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार असेल तर जरा थांबा! कारण काही दिवसात….

Ajay Patil
Published:
ev car update

EV Car Update:- सध्या हळूहळू संपूर्ण देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढताना दिसून येत असून त्यामध्ये विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर पासून तर दुचाकी, तीनचाकी आणि विविध कंपन्यांच्या कारचा समावेश आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहेच.

परंतु वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या पार्श्वभूमीवर देखील ही वाहने परवडणारी असल्याने साहजिकच ग्राहक त्यांच्याकडे वळू लागले आहेत. परंतु सध्या जर आपण यामधील समस्या पाहिली तर इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती या खूप जास्त असल्यामुळे अजून देखील हव्या त्या प्रमाणामध्ये या वाहनांचा वापर होताना आपल्याला दिसत नाही.

परंतु तरीदेखील केंद्र सरकारच्या काही अनुदान योजनांमुळे अशा वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळताना दिसून येत आहे. या अनुषंगाने जर तुम्हाला देखील इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर थोडे थांबणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. देशातील इलेक्ट्रिक कारची जी बाजारपेठ आहे ती येणाऱ्या दोन वर्षांमध्ये पूर्णपणे बदलण्याची शक्यता असून त्यामुळे कमी किमतीत तुम्हाला इलेक्ट्रिक कार येणाऱ्या कालावधीत मिळणे शक्य होणार आहे.

 येणाऱ्या कालावधीत इलेक्ट्रिक कारच्या किमती होतील कमी?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशातील इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेत दोन वर्षात पूर्णपणे बदल होण्याची शक्यता आहे व त्यामागील प्रमुख कारण म्हणजे बॅटरी आणि चीप या दोन्हींच्या किमती सध्या घसरायला लागल्या आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर एक किलो वॅट पावर बॅटरीची किंमत 2021 मध्ये साधारणपणे भारतीय चलनात दहा हजार 850 रुपये होती  व 2023 मध्ये त्यात घसरण होऊन ती 8350 रुपये पर्यंत खाली घसरली.

त्यामुळे या क्षेत्रातील तज्ञांच्या मते, याच्या बॅटरी आणि चीपच्या किमतीमध्ये घसरण झाली त्याचा फायदा घेण्यासाठी नवीन वाहन उत्पादक कंपन्यांनी बाजारामध्ये प्रवेश केला तर  स्पर्धा वाढेल व किमती आणखी कमी होतील. साधारणपणे 2024 पर्यंत एक किलोवॅट क्षमतेचा खर्च हा 6650 रुपये पर्यंत कमी होईल.

आपण इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती बघितल्या तर 70 टक्के त्यामध्ये बॅटरीची किंमत असते. सध्या वाहन बाजारामध्ये 17 ते 108 kWh क्षमतेच्या बॅटरी असलेल्या वाहने बाजारात आहेत.

त्यामुळे बॅटरीच्या किमती घसरल्या तर दहा लाखाची ईव्ही आठ लाख साठ हजार पर्यंत मिळणे शक्य होणार आहे. तसेच सध्या आपल्या देशामध्ये सेमीकण्डक्टरचे उत्पादन काही दिवसात सुरु होण्याची शक्यता असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहन निर्मितीतील खर्च परत दहा टक्के कमी होईल व त्यामुळे किंमत सात लाख रुपये पर्यंत येऊ शकते.

 बॅटरीच्या किमती कमी झाल्यामुळे वाहनांच्या किमती कमी झाल्या

या क्षेत्रातील तज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्या मते बॅटरी स्वस्त झाल्याचा परिणाम सध्या दिसून येत आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर एमजी मोटर इंडियाने कोमेट ईव्हीची किंमत आठ लाख रुपयांवरून सात लाख रुपयांपर्यंत कमी केली आहे.

येणाऱ्या 2025 पर्यंत या श्रेणीतील इलेक्ट्रिक कार ची किंमत पाच लाख रुपये असेल. या किमतीमध्ये सध्या कुठल्याही कंपनीची पेट्रोल कार देखील मिळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहक इलेक्ट्रिक वाहनाकडे वळू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe