Captain 280 4WD Tractor:- भारतामध्ये अनेक ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून यामध्ये अनेक कंपन्या या मिनी ट्रॅक्टरची निर्मिती देखील करतात. जर आपण मिनी ट्रॅक्टरचा विचार केला तर फळबागांकरिता या मिनी ट्रॅक्टरचा खूप मोठा उपयोग होतो.
तसेच शेतीच्या अनेक विविध कामांकरिता मिनी ट्रॅक्टर खूप फायद्याचे ठरतात. ट्रॅक्टर निर्मिती कंपन्यांचा विचार केला तर यामध्ये कॅप्टन ही कंपनी देखील भारतातील शेतकऱ्यांमध्ये एक विश्वासू कंपनी म्हणून ओळखली जाते.
अनेक मोठ्या कालावधीपासून ही कंपनी शेतकऱ्यांसाठी मजबूत परफॉर्मन्स असलेले ट्रॅक्टर तयार करत आहे. कॅप्टन कंपनीच्या ट्रॅक्टरमध्ये अत्याधुनिक असे प्रगत तंत्रज्ञान आणि नवीन अशा वैशिष्ट्यांचा समावेश आपल्याला दिसून येतो. या अनुषंगाने जर तुम्हाला देखील शेतीसाठी एखादा शक्तिशाली असा चांगला मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही कॅप्टन कंपनीच्या कॅप्टन 280 4WD हा चांगला पर्याय ठरू शकतो.
कॅप्टन 280 4WD मिनी ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
या ट्रॅक्टरमध्ये 1290 सीसी क्षमतेचे दोन सिलेंडर वॉटर कुल्ड इंजिन देण्यात आलेले आहे व ते 28 एचपी पावर जनरेट करते. हा ट्रॅक्टर ड्राईव्ह टाईप एअर फिल्टरसह येतो व या ट्रॅक्टरचे इंजिन 2500 आरपीएम जनरेट करते.
या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 25 किलोमीटर प्रतितास ठेवण्यात आलेला असून ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 750 kg इतकी आहे. आपण कॅप्टनच्या या ट्रॅक्टरचे वजन पाहिले तर ते 945 किलोग्रॅम असून हा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर 1550 एमएम व्हीलबेस मध्ये 2610mm लांबी 825mm रुंदीसह तयार केला आहे.
तसेच या ट्रॅक्टरमध्ये मेकॅनिकल/ पावर( पर्यायी ) स्टेरिंग देण्यात आलेली असून या छोट्या ट्रॅक्टरमध्ये आठ फॉरवर्ड + दोन रिव्हर्स गियरसह गिअरबॉक्स आहे. तसेच हा छोटा ट्रॅक्टर सिंगल क्लच सह येतो आणि त्याला सिंनक्रोमेश प्रकारचे ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
या ट्रॅक्टरला १९ लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आलेली आहे व हा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर ट्वीन स्पीड पीटीओ पावर टेकऑफसह येतो. जो 540 आरपीएम जनरेट करतो. कॅप्टन 280 ट्रॅक्टर हा चार व्हील ड्राईव्हमध्ये येतो.
किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?
कॅप्टन कंपनीच्या माध्यमातून अत्यंत कमीत कमी किमतीत हा मिनी ट्रॅक्टर बाजारात आणला गेला आहे. कॅप्टन 280 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत 4 लाख 82 हजार ते पाच लाख रुपये पर्यंत ठेवण्यात आली आहे.
तसेच ऑन रोड किंमतीत आरटीओ नोंदणी आणि सर्व राज्यांमध्ये लागू असलेल्या रोड टॅक्समुळे बदल होऊ शकते. तसेच कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरसह सातशे तास किंवा एक वर्षाची वारंटी प्रदान करण्यात आलेली आहे.