Car Discount Offer:- भारतामध्ये जेवढ्या कार उत्पादक कंपन्या आहेत त्यामध्ये मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक लोकप्रिय असे मॉडेल्स सादर केले असून सर्वसामान्य भारतीय नागरिकांपासून तर गर्भ श्रीमंत असलेल्या व्यक्तींपर्यंत मारुती सुझुकीचे कार मॉडेल्स प्रसिद्ध आहेत.
मारुती सुझुकीचे अनेक कार मॉडेल सध्या बाजारात असून यामध्ये प्रामुख्याने मारुती जिमनी, ग्रँड विटारा, बलेनो तसेच फ्रंटेक्स यासारख्या कार मॉडेलचा यामध्ये समावेश करता येईल. त्यामुळे भारतीय ग्राहक मोठ्या प्रमाणावर मारुती सुझुकीचे कार घेण्याला पसंती देतात.
त्यामुळे जर आता तुम्हाला देखील मारुती सुझुकीची कार घ्यायची असेल तर कंपनीच्या माध्यमातून या महिन्यात संपूर्ण नेक्सा लाईन अपवर आकर्षक सूट देण्यात येत आहे. यामध्ये बलेनो, ग्रँड विटारा तसेच फ्रंटेक्स इत्यादी मॉडेलचा समावेश आहे.
या मॉडेल्सवर मारुती सुझुकीच्या माध्यमातून कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर सोबत कॉर्पोरेट डिस्काउंट देखील देण्यात येत आहे. याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.
मारुती सुझुकी या लोकप्रिय कार मॉडेलवर देत आहे डिस्काउंट
1- मारुती सुझुकी जिमनी– मारुती सुझुकी जिमनीच्या टॉप स्पेस अल्फा ट्रिमवर कंपनीकडून एक लाख 50 हजार रुपयांची कॅश सवलत दिली जात असून नवीन MY2024 मॉडेलला एन्ट्री लेवल झेटा ट्रिमवर पन्नास हजार रुपयांची रोख सवलत मिळत आहे.
2- मारुती सुझुकी फ्रॉँक्स– फ्रॉँक्सच्या टर्बो पेट्रोल व्हेरिएंटवर मारुती सुझुकी कंपनी 68 हजार रुपयांपर्यंत सूट देत असून यामध्ये पंधरा हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, तीस हजार रुपयांची विलोसिटी एडिशन ॲक्सेसरी किट,
दहा हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 13 हजार रुपयांची कॉर्पोरेट सुट यांचा समावेश असून त्यासोबत नियमित पेट्रोल व्हेरियंटवर 20 हजाराची आणि सीएनजी व्हेरियंटवर दहा हजार रुपये पर्यंतचे सूट मिळत आहे.
3- मारुती इग्निस– मारुती इग्निसचे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही प्रकार हे 58 हजार रुपयांपर्यंतच्या फायद्यांसह सध्या उपलब्ध आहेत
व यामध्ये चाळीस हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, पंधरा हजार रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट आणि तीन हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.
4- मारुती बलेनो– मारुती सुझुकी बलेनोच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 53 हजार रुपयापर्यंतच्या फायद्यांचा उपलब्ध आहे व यामध्ये पस्तीस हजार रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट,
पंधरा हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि तीन हजार रुपयांचे कॉर्पोरेट फायदे यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच सीएनजी प्रकारावर 15 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट उपलब्ध आहे.
5- मारुती सियाझ– मारुती सियाजच्या सर्व प्रकारांवर 53 हजार रुपये पर्यंतची सूट देण्यात येत असून यामध्ये 25 हजार रुपयांची रोख सवलत, 25 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि तीन हजार रुपयांची कार्पोरेट सूट समाविष्ट आहे.
6- मारुती सुझुकी XL6- मारुती सुझुकीच्या XL6 या महिन्यात फक्त वीस हजारच्या एक्सचेंज बोनससह लिस्टेड आहे व या कार मधील सीएनजी प्रकार देखील उपलब्ध आहे. परंतु त्यावर सध्या कोणत्याही प्रकारची सूट दिली जात नाहीये.