Car Information: नवीन कार घ्यायच्या अगोदर जाणून घ्या SUV, MUV, XUV आणि TUV कारमधील फरक! कार घेणे होईल सोपे, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
car information

Car Information:- भारतामध्ये अनेक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक वेगळ्या प्रकारचे सेगमेंट आणि व्हेरियंटमध्ये कार लॉन्च केल्या जातात. त्यामुळे ज्या ग्राहकांना कार घ्यायची असते ते त्यांची गरज म्हणजेच कोणत्या उद्दिष्टासाठी कार घ्यायचे आहे?

याचा प्रामुख्याने विचार करतात व दुसरी बाब म्हणजे आर्थिक बजेट  या सगळ्या गोष्टी पाहूनच कारची निवड केली जाते. आता जेव्हा आपण कार खरेदी करण्याचा निर्णय घेतो तेव्हा आपण याबाबत जेव्हा चाचपणी करत असतो तेव्हा आपल्याला कारच्या बाबतीत एसयुव्ही, एक्सयुव्ही, एमयुव्ही आणि टीयुव्ही हे शब्द ऐकतो किंवा हे शब्द आपल्या कानावर पडतात.

या शब्दांचा अर्थ आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसतो. कारण आपल्याला या सर्व प्रकारच्या कार एकच आहेत असे वाटतात. परंतु या सर्व प्रकारच्या कारमध्ये बराच फरक आढळून येतो.

त्यामुळे या लेखामध्ये आपण या शब्दांचा किंवा या नावाचा अर्थ नेमका काय होतो व या दृष्टिकोनातून तुम्हाला कोणत्या प्रकारातील कार घेणे फायद्याचे राहील? याबद्दल माहिती घेणार आहोत.

 काय आहे SUV, TUV, MUV आणि XUV या शब्दांचा किंवा या नावाचा अर्थ?

1-SUV म्हणजे नेमके काय?- ‘एसयूव्ही’ या शब्दाचा अर्थ स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल असा होतो व या प्रकारच्या कार पावरफुल इंजिन असलेल्या असतात. ऑफरोडींगसाठी या कार ओळखल्या जातात. मुख्य म्हणजे एसयुव्हीमध्ये अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात.

कारचा आकार कसा आहे त्यानुसार हे प्रकार ठरत असतात. प्रामुख्याने यात मिडसाईज, फुल आणि कॉम्पॅक्ट साईज असे तीन प्रकार येतात. यामध्ये उदाहरण घ्यायचे झाले तर मारुतीची क्रेटा ही एक मिड साइज एसयूव्ही आहे.तर ब्रिजा हे सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे.

2-TUV म्हणजे नेमके काय?- टीयुव्हीचा अर्थ टफ युटीलिटी व्हेइकल असा होतो. या गाड्यांची वैशिष्ट्ये ही एसयूव्ही गाड्यांसारखे असतात. मात्र एसयुव्ही कार च्या तुलनेमध्ये टीयुव्ही प्रकारच्या कार लहान आकाराच्या असतात.

3-MUV म्हणजे नेमके काय?- एमयुव्हीचा अर्थ मल्टी युटीलिटी व्हेईकल असा होतो व या गाड्या ऑन आणि ऑफरोडींग आणि इतर महत्वाच्या गोष्टींसाठी देखील वापरता येतात. महत्त्वाचे म्हणजे एमयूव्ही प्रकारच्या गाड्यांची कामगिरी ही ऑन रोड खूप उत्तम असते.

4-XUV म्हणजे नेमके काय?- एक्सयुव्ही याचा अर्थ क्रॉसओव्हर युटिलिटी वेहिकल्स असा होतो. या प्रकारच्या कारमध्ये एमयूव्ही सारखीच मोकळी आणि भरपूर जागा असते.

तसेच एक्सयुव्ही प्रकारच्या गाड्या एक्सयुव्ही प्रकारच्या कार प्रमाणेच ऑफ रोड देखील चालवता येणे शक्य आहे. त्यामुळेच या प्रकारच्या कारला किंवा गाड्यांना क्रॉस ओव्हर व्हीकल असे देखील म्हटले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe