Cheapest Car List:- आयुष्यामध्ये प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्या घरासमोर स्वतःची चारचाकी असावी. त्यामुळे प्रत्येक नोकरी किंवा व्यवसाय करणारा व्यक्ती त्यासाठी आपल्याला प्रयत्न करताना दिसून येतो. प्रत्येक व्यक्ती जेव्हा कार घेण्याचा विचार करतो तेव्हा मात्र आपला बजेट आणि चांगला मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असतात.
जर आपण कार बाजारपेठेचा विचार केला तर अनेक महागड्या कार उपलब्ध आहेत. परंतु प्रत्येकच व्यक्तीला अशा महागड्या कार घेणे परवडत नाही. दुसरी बाब म्हणजे मायलेज ही गोष्ट वाहनाच्या बाबतीत खूप महत्त्वाचे असते.
कारण मायलेजचा सरळ प्रभाव हा आपल्या खिशावर पडत असल्यामुळे चांगल्या मायलेजची कार घेणे खूप गरजेचे असते. याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण स्वस्त अशा साडेतीन लाखापासून सुरू होणाऱ्या व चांगले मायलेज देणाऱ्या काही कारची माहिती घेणार आहोत.
या आहेत परवडणाऱ्या किमतीतील उत्तम मायलेज देणाऱ्या कार
1- मारुती सुझुकी अल्टो के10- मारुती सुझुकीची अल्टो के 10 ही एक बजेट मधील कार असून तिची डिझाईन देखील उत्तम प्रकारची आहे. या कारमध्ये इंटरियर स्पेस चांगला असून ही कार एका लिटर मध्ये 24.90 किलोमीटर पर्यंत धावते.
पाच जण या कारमध्ये अगदी आरामांमध्ये प्रवास करू शकतात. या कारची वैशिष्ट्ये पाहिले तर यामध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम व त्यासोबत एअरबॅग व ईबीडी देखील देण्यात आलेले आहे. तसेच या कारची किंमत पाहिली तर एक्स शोरूम किंमत तीन लाख 99 हजार पासून सुरु होते.
2- मारुती सुझुकी ऑल्टो 800- मारुती सुझुकीची अल्टो 800 ही देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल कार म्हणून ओळखले जाते. या कारमध्ये कंपनीने 796 सीसी क्षमतेची इंजिन दिलेली असून ही कार 22 किलोमीटरचे मायलेज देते.
या कारमध्ये देखील पाच व्यक्ती आरामात बसून प्रवास करू शकतात. अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि ईबीडीसह एअरबॅग यामध्ये देण्यात आलेले आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत तीन लाख 54 हजार रुपयांनी सुरू होते.
3- रेनॉल्ट क्विड– ही एक उत्तम स्पेस असलेली कार असून या कारचे फिचर्स देखील उत्तम आहेत. पाच जण या कारमध्ये आरामात प्रवास करू शकतात. या कारमध्ये 1.0 एल इंजिन देण्यात आले आहे.
एका लिटरमध्ये ही कार 21 ते 22 किलोमीटर धावू शकते. कंपनीने या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि ईबीडी सह एअरबॅग्स दिले आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत चार लाख 69 हजार रुपये आहे.
4- मारुती सुझुकी एस–प्रेसो – ही मायक्रो एसयूव्ही सेगमेंट मधील मारुती सुझुकीची कार खूप प्रसिद्ध आहे. या कारमध्ये देखील व्यवस्थित असा उत्तम स्पेस देण्यात आला असून या वाहनात 1.0 एल पेट्रोल इंजिन आहे.
या कारचा मायलेज पाहिला तर तो 25.30 किलोमीटर आहे. तसेच इतर कार सारखे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि एअरबॅगची सुविधा देण्यात आली आहे. या कारची किंमत चार लाख 26 हजार रुपये पासून सुरु होते.