Electric Bike Price:- सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढताना दिसून येत असून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा फायद्याचा ठरताना दिसून येत आहे.
इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये बाईकच नाही तर आता कार देखील निर्माण केल्या जात असून तुम्हाला काही वर्षात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक बाइक्स आणि कार्स आपल्याला दिसतील यामध्ये शंकाच नाही. या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण एक लाख ते दोन लाख रुपयांच्या रेंजमध्ये उत्तम अशा इलेक्ट्रिक बाइक्स कोणत्या आहेत? त्याबद्दलची माहिती घेणार आहोत.
या आहेत महत्त्वाच्या इलेक्ट्रिक बाइक्स
1- रिहॉल्ट आरव्ही 400 बीआरझेड– ही बाईक रीहोल्ट मोटर्सची असून या इलेक्ट्रिक मोटर सायकलची एक्स शोरूम किंमत एक लाख 38 हजार रुपये आहे. ही मोटरसायकल पाच रंगांमध्ये येते व सिंगल चार्जवर दीडशे किलोमीटरची रेंज देते.
2-Tork Kretos R- टॉर्क मोटरची ही इलेक्ट्रिक मोटरसायकल असून या बाईकची किंमत एक लाख 67 हजार रुपये आहे. हे बाईक्स सिंगल चार्जवर 180 km ची रेंज देते व यीचा टॉप स्पीड 105 किलोमीटर प्रतितास आहे.
3-Oben Roar: ही कंपनी बंगलोर येथे असून ओबन या इलेक्ट्रिक मोटरसायकलची एक्स शोरूम किंमत एक लाख 49 हजार रुपये असून ती सिंगल चार्ज मध्ये 200 किलोमीटरची रेंज देते व हिचा टॉप स्पीड शंभर किलोमीटर प्रति तास इतका आहे.
4- मॅटर एरा– या इलेक्ट्रिक बाइकची एक्स शोरूम किंमत एक लाख 73 हजार रुपये असून ही इलेक्ट्रिक बाइक सिंगल चार्जर 125 किलोमीटर पर्यंत चालते.
5- टोमाकी रेंजर– या इलेक्ट्रिक क्रुझर बाईकची एक्स शोरूम किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये असून ती सिंगल चार्जवर 250 किलोमीटरची रेंज देते.
6- स्विच सीएसआर 762- या इलेक्ट्रिक बाइकची एक्स शोरूम किंमत एक लाख 89 हजार रुपये असून ती सिंगल चार्ज वर 160 किमीची रेंज देते व या बाईकचा टॉप स्पीड 110 किलोमीटर प्रतितास आहे.
7- कबीरा मोबिलिटी केएम 3000Rs- या इलेक्ट्रिक मोटर सायकलची किंमत एक लाख 62 हजार रुपये असून सिंगल चार्ज मध्ये 120 किलोमीटर पर्यंत रेंज देते व या बाईकचा टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रतितास आहे.
8-Orxa Mantis- या इलेक्ट्रिक मोटर सायकलची किंमत तीन लाख साठ हजार रुपये असून इलेक्ट्रिक बाइक मागच्या वर्षी लॉन्च करण्यात आली असून ही सिंगल चार्ज बॅटरी मध्ये २११ किलोमीटरची रेंज देते व टॉप स्पीड 135 किलोमीटर प्रति तास इतका आहे.