Force Balwan 550 Tractor: शेती व व्यवसायिक कामासाठी पावरफूल ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर फोर्सचा ‘हा’ ट्रॅक्टर ठरेल फायद्याचा! वाचा किंमत आणि वैशिष्ट्य

Ajay Patil
Published:
force balwan 550 tractor

Force Balwan 550 Tractor:- शेती क्षेत्रामध्ये ट्रॅक्टरची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी अनेक महत्त्वाचे कामे कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात करू शकतात. तसेच यांत्रिकीकरणाच्या या युगामध्ये कृषी क्षेत्रात अनेक यंत्रे विकसित झालेली आहेत

व यातील बरीच यंत्र ही ट्रॅक्टरचलित असल्याने ट्रॅक्टरचे महत्व शेतीच्या दृष्टिकोनातून आणखीनच वाढते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे शेतीमध्ये बऱ्याचदा अनेक अवघड आणि कठीण कामे करावी लागतात व यासाठी शक्तिशाली म्हणजेच पावरफूल ट्रॅक्टर असणे खूप गरजेचे असते.

म्हणून कोणताही शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करणे अगोदर ट्रॅक्टर पावरफुल असावे या दृष्टिकोनातून निवड करत असतो.

त्यामुळे या लेखात आपण अशाच एका पावरफुल ट्रॅक्टरची माहिती घेणार आहोत जे शेतीतील अवघडातली अवघड कामे अगदी सहजतेने करू शकतो. हे ट्रॅक्टर फोर्स कंपनीचे असून त्या ट्रॅक्टरचे नाव आहे फोर्स बलवान 550 ट्रॅक्टर होय.

 फोर्स बलवान 550 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

 फोर्स बलवान 550 ट्रॅक्टरमध्ये २५९६ सीसी क्षमतेचे चार सिलेंडर वॉटर कुल्ड इंजिन आहे. जे 51 एचपी पावर जनरेट करते. कंपनीचा हा ट्रॅक्टर ऑइल बाथ विथ प्री क्लीनर एअर फिल्टरसह येतो. या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 43.4 एचपी आहे

व त्याची इंजिन 2600 आरपीएम जनरेट करते. कंपनीचा हा ट्रॅक्टर साठ लिटर क्षमतेचे इंधन टाकीसह येतो. या ट्रॅक्टरची हायड्रोलिक पावर १३५० ते १४५० किलो आणि ट्रॅक्टरचे एकूण वजन 2070 किलो आहे. फोर्स कंपनीचा हा शक्तिशाली ट्रॅक्टर 1970 mm विलबेसमध्ये  3325mm लांबी आणि 1885 एमएम रुंदीचा आहे.

तसेच या ट्रॅक्टरमध्ये पावर स्टेरिंग असून त्यामुळे सुरक्षित ड्रायव्हिंग करण्यास मदत होते. बलवान सिरीज मधील या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला आठ फॉरवर्ड+ चार रिव्हर्स गिअर्स असलेला गिअरबॉक्ससह मिळतो.

कंपनीचा हा ट्रॅक्टर ड्राय, ड्युअल क्लच प्लेट क्लचसह येतो. तसेच या ट्रॅक्टरमध्ये सिंक्रमेश ट्रान्स एक्सल ट्रान्समिशन आहे. फोर्स ट्रॅक्टरमध्ये मल्टी प्लेट ऑइल एमर्स डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत व हा ट्रॅक्टर मल्टी स्पीड पीटीओ  पावर टेकऑफसह येतो. फोर्स बलवान 550 ट्रॅक्टरमध्ये दोन व्हील ड्राईव्ह आहेत.

 फोर्स बलवान 550 ट्रॅक्टरची किंमत

 या ट्रॅक्टरची भारतात एक्स शोरूम किंमत सहा लाख 40 हजार ते सहा लाख 70 हजार रुपये इतकी आहे. या फोर्स बलवान 550 ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि सर्व राज्यांमध्ये लागू असलेल्या रोड टॅक्समुळे बदलू शकते. तसेच ही कंपनी फोर्स बलवान 550 ट्रॅक्टर सह तीन वर्षाची वारंटी देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe