Vehicle Tool Kit:- वाहन कुठलेही असले तर त्याच्या दीर्घकालीन चांगल्या वापराकरिता वाहनाची वेळोवेळी देखभाल आणि स्वच्छता खूप गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येक वाहन मालक हे वाहनाची वेळेवर सर्विसिंग करण्यापासून तर तिला स्वच्छ ठेवण्यापर्यंत इत्यादी गोष्टी अगदी वेळेवर करत असतात.
तसेच सर्विस सेंटरवर जाऊन वेळोवेळी गाडी धुवून घेणे यासारखे गोष्टी देखील वाहनमालक करतात. परंतु वाहनाच्या संदर्भात जेव्हा आपण सर्विसिंग किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी करतो तेव्हा आपल्याला गॅरेजला जायला लागते. परंतु जेव्हा आपण गॅरेजला जातो तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पैसा लागू शकतो. त्यामुळे बरेच जण गाडी साफ करायचे असेल किंवा गाडी धुवायचे असेल तर गॅरेजवर न जाता घरीच धुतात.
त्यामध्ये गाडी बाहेरच्या बाजूने धुणे सोपे असते. परंतु आतल्या बाजूने गाडी साफ करणे खूप कठीण काम असते. परंतु आता अशा पद्धतीने जर तुम्हाला गाडी स्वच्छ करायची असेल तर अनेक प्रकारचे साहित्य सध्या बाजारपेठेत मिळते. परंतु अशा आवश्यक वस्तू वेगवेगळ्या घेतल्याने मोठा खर्च करावा लागतो.
परंतु याकरिता जर तुम्हाला सगळ्या वस्तू एकाच किटमध्ये मिळाल्या तर खूप छान होईल असे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल. तर हो आता अशा पद्धतीची एक किट बाजारामध्ये आली असून त्यामध्ये तुम्हाला गाडीला आवश्यक असणारे सगळे साहित्य मिळते. या किटमध्ये तुम्हाला गाडी साफ करण्यासाठी आवश्यक व्याक्युम क्लिनर ते टायर पंचर झाला तर ते पंचर काढण्यासाठी आवश्यक साहित्य देखील या किटमध्ये उपलब्ध आहे.
बाजारात आले ग्रीनकोर इलेक्ट्रिक कंपनीचे किट
सध्या बाजारामध्ये ग्रीनकोर इलेक्ट्रिक या कंपनीचे किट आले असून या किटमध्ये तुम्हाला व्हॅक्युम क्लिनर तसेच टायरमध्ये हवा भरण्यासाठी आवश्यक प्रेशर पंप, तुम्ही कुठे लांब प्रवासाला जात आहात व टायर पंचर झाला तर त्या किटमध्ये तुम्हाला टायरचे पंचर काढण्यासाठी लागणारे आवश्यक गॅजेट इत्यादी सगळे साहित्य देण्यात आलेले आहे.
साधारणपणे या किटमध्ये प्रेशर पंप, पंचर काढण्यासाठी आवश्यक असलेले सामान आणि व्हॅक्युम क्लिनर देण्यात आलेला आहे. तुम्ही लांबच्या प्रवासाला जात आहात व वाटेमध्ये टायर पंचर झाला तर या किटमध्ये देण्यात आलेल्या साहित्याच्या मदतीने तुम्ही टायरचे पंक्चर देखील आरामात काढू शकतात तसेच व्हॅक्युम क्लीनरच्या मदतीने गाडीची
साफसफाई देखील करू शकतात.
किती आहे या किटची किंमत?
ग्रीनकोर इलेक्ट्रिक कंपनीने हे किट मार्केटमध्ये आणले असून ते खूप स्वस्त आहे. या कंपनीचे हे महत्त्वाचे कीट तुम्ही 2360 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.