HDFC Bike Loan: घ्या तुमची आवडीची बाईक आणि एचडीएफसी बँकेकडून मिळवा किमतीच्या 100% लोन! अशा पद्धतीने करा अर्ज

Ajay Patil
Published:
hdfc bike loan

HDFC Bike Loan:- जर तुम्हाला बाईक घ्यायची असेल आणि तुमच्याकडे जर पैसे नसतील तर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या बाईक लोनचा आधार घेऊ शकता व तुमच्या आवडीची बाईक खरेदी करू शकतात. एचडीएफसी बाईक लोन पर्यायामधून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बाईक करिता लोन मिळवू शकतात

व या कर्जावरील व्याजदर देखील खूपच कमी आहेत. तसेच एचडीएफसी बँकेकडून टू व्हीलरच्या किमतीच्या 100% पर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकते व ही प्रक्रिया देखील बँकेकडून ताबडतोब पूर्ण केली जाते. या लेखामध्ये आपण एचडीएफसी बाईक लोन विषयीची पूर्ण माहिती बघू.

एचडीएफसी बाईक लोनचे फायदे आणि वैशिष्ट्ये

1- तुम्ही एचडीएफसी बँकेकडून तुमच्या टू व्हीलरची जी किंमत असेल त्या किमतीच्या 100% पर्यंत कर्ज मिळवू शकतात.

2- तुमच्या कुठल्याही आवडत्या बाईक करिता तुम्ही एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेऊ शकता.

3- एचडीएफसी बँक त्यांच्या प्री अप्रुव्हड म्हणजेच पूर्व मंजूर ग्राहकांना कुठल्याही कागदपत्रांशिवाय अगदी मिनिटांमध्ये बाईक कर्ज मंजूर करते.

4- तसेच महत्त्वाचे म्हणजे जर एचडीएफसी बँकेमध्ये महिलांचे बचत खाते असेल तर त्यावर प्रक्रिया शुल्क मध्ये 50% पर्यंत सूट बँक देत असते.

5- एवढेच नाही तर महिला बचत खात्यावर दोन टक्के कमी व्याजदराने तुम्हाला कर्ज मिळू शकते.

6- तुम्ही घेतलेले कर्जाची परतफेड ही सोयीस्कर ईएमआय पर्याय निवडून करू शकता तो या कर्ज परतफेडीचा कालावधी हा बारा महिने ते 48 महिन्या दरम्यानचा असतो.

7- तसेच तुम्हाला एचडीएफसी बाईक लोन करिता कुठल्याही प्रकारची सुरक्षा किंवा तारण देण्याची गरज नाही.

8- बाईक लोनची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँक सात वर्किंग डेज मध्ये कर्जाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करते.

9- या कर्जाकरिता तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

10- एचडीएफसी बाईक लोनमध्ये तुम्हाला एकूण कर्ज रकमेच्या 2.5 टक्क्यांपर्यंत प्रोसेसिंग फी म्हणजेच प्रक्रिया शुल्क भरावे लागते.

 एचडीएफसी टू व्हीलर लोनसाठी आवश्यक पात्रता

1- एचडीएफसी टू व्हीलर लोन करिता अर्जदाराचे वय 18 ते 65 वर्ष दरम्यान असावे.

2- कोणतीही स्वयंरोजगार असलेली व्यक्ती किंवा पगारदार व्यक्ती एचडीएफसी टू व्हीलर लोनसाठी अर्ज करू शकते.

3- एचडीएफसी बाईक लोनकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची सुरक्षा देण्याची गरज नाही.

4- एचडीएफसी बाईक लोन घेण्याकरिता तुमचा सिबिल स्कोर मात्र चांगला असायला हवा.

5- टू व्हीलर लोन करिता अर्जदाराचे किमान मासिक उत्पन्न दहा हजार रुपये असावे.

 एचडीएफसी टू व्हीलर लोनकरीता आवश्यक कागदपत्रे

एचडीएफसी टू व्हीलर लोन साठी अर्ज करण्याकरिता अर्जदाराच्या आधार कार्ड, ओळख प्रमाणपत्र तसेच मतदार ओळखपत्र, चालक परवाना, बँकेचे स्टेटमेंट तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक असतात.

 एचडीएफसी बँकेकडून टू व्हीलर लोन घेण्यासाठी अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज

1- एचडीएफसी टू व्हीलर लोनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे.

2- त्या ठिकाणी गेल्यानंतर होम पेजवर जेव्हा तुम्ही याल त्या ठिकाणी तुम्हाला टू व्हीलर लोनचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करावे.

3- या ठिकाणी तुम्हाला टू व्हीलर लोन विषयी संपूर्ण माहिती मिळेल व ती तुम्ही अगोदर काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

4- त्यानंतर खाली तुम्हाला अप्लाय  ऑनलाईनचा पर्याय दिसेल व त्यावर तुम्ही क्लिक करावे.

5- त्यानंतर अर्ज तुमच्यासमोर उघडेल व तो तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यावा व आवश्यक माहिती त्यामध्ये भरावी आणि विचारलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घ्यावीत.

6- कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करावे.

7- त्यानंतर एचडीएफसी बँकेचे कर्मचारी तुमच्याशी संपर्क साधतील व सर्व तुमचे क्रेडिट ठीक असेल तर तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

तसेच तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन देखील एचडीएफसी लोन करीत अर्ज करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe