Indo Farm 4195 DI Tractor:- ट्रॅक्टरचा वापर शेतकरी शेतीतच नाही तर इतर अनेक व्यवसाय कारणांसाठी करत असतात. परंतु ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जाणारी प्रत्येकच कामे ही अवजड स्वरूपाची असल्याने अशा कामांसाठी मजबूत व शक्तिशाली ट्रॅक्टर असणे गरजेचे असते.
त्यामुळे जो कोणी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करतो तो या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच ट्रॅक्टरची निवड करत असतो. अशी मजबूत व शक्तिशाली तसेच तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली अनेक कंपन्यांची ट्रॅक्टर सध्या उपलब्ध आहेत.
यामध्ये इंडो फार्म ट्रॅक्टर कंपनीचे ट्रॅक्टर देखील शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रसिद्ध व लोकप्रिय होताना दिसून येत आहे. या कंपनीकडून तयार केले जाणारे ट्रॅक्टर ही कार्यक्षम तंत्रज्ञानासह तयार केले जातात
एवढेच नाही तर कमीत कमी डिझेलच्या वापरात शेतीची जास्तीत जास्त कामे करण्यासाठी देखील इंडो फार्म ट्रॅक्टर लोकप्रिय आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर आपण या लेखांमध्ये इंडो फार्मच्या “इंडो फार्म 4195 डीआय’ या पावरफूल ट्रॅक्टरची माहिती बघणार आहोत.
“इंडो फार्म 4195 डीआय’ ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
या ट्रॅक्टरमध्ये चार सिलेंडर वॉटर कुल्ड इंजिन देण्यात आलेले असून ते 95 एचपी पावर जनरेट करते. कंपनीचा हा ट्रॅक्टर ड्राय टाईप एअर फिल्टरसह येतो व यामुळे धुळी पासून इंजिनचा बचाव होतो. तसेच या ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पावर 81.7 एचपी असून त्याचे इंजिन 2200 rpm जनरेट करते.
तसेच या ट्रॅक्टरला चांगल्या क्षमतेची इंधन टाकी देण्यात आलेली असून याची हायड्रोलिक क्षमता म्हणजेच वजन उचलण्याची कपॅसिटी 2960 किलोग्रॅम इतकी आहे. तसेच या ट्रॅक्टरची लांबी 3990 mm व रुंदी १९९० एमएम इतकी आहे. इंडो फार्म कंपनीच्या या ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स 410 एमएम इतका आहे.
या ट्रॅक्टरची इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये
इंडो फार्म 4195 डीआय ट्रॅक्टरमध्ये हायड्रोस्टॅटीक पावर टाईप स्टेरिंग देण्यात आलेली असून जी शेतातच नाही तर अगदी खडबडीत रस्त्यांवर देखील उत्तम ड्रायव्हिंगचा अनुभव देते. या ट्रॅक्टरमध्ये 12 फॉरवर्ड व बारा रिव्हर्स गिअरसह गिअर बॉक्स आहे.
तसेच हा ट्रॅक्टर डबल, मेन क्लच डिस्क सिरामेटॅलिक क्लचसह येतो आणि त्यामध्ये सिंक्रमेश प्रकारचे ट्रान्समिशन आहे. तसेच हा ट्रॅक्टर 1.60 ते 33.86 किमी प्रतितास फॉरवर्ड स्पीड आणि 1.34 ते 28.44 किमी प्रतितास रिव्हर्स स्पीडमध्ये येतो. हा चार व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे.
किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?
भारतातील इंडो फार्म 4195 डीआय ट्रॅक्टरची भारतातील एक्स शोरूम किंमत ही 13 लाख 10 हजार ते 13 लाख 60 हजार रुपये ठेवण्यात आली असून या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे काही राज्यांमध्ये बदलण्याची शक्यता आहे. तसेच या ट्रॅक्टरसह तुम्हाला एक वर्षाची वारंटी देखील कंपनीच्या माध्यमातून मिळते.