7 Seater Car:- जेव्हा आपण कार खरेदी करायचा विचार करतो तेव्हा आपला आर्थिक बजेट पाहतोच परंतु त्याशिवाय कुटुंबातील सदस्य संख्या किती आहे याचा विचार देखील आपण करत असतो. कारण जेव्हा आपण कुटुंबासहित कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅनिंग करतो तेव्हा आपले कुटुंबातील सदस्य कार मध्ये मावतील या बेताने आपण कार घेण्याचा विचार करत असतो.
यामध्ये सात सीटर कार ही फार महत्त्वाचे असते.जर आपण सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या कारचा विचार केला तर अनेक कंपन्यांनी सात सीटर कार विकसित केलेल्या आहेत व यामध्ये किया मोटर्सची kia Carens एमपीव्ही कार खूप फायद्याचे ठरेल व ही कार पहिल्यांदा 2020 मध्ये दक्षिण कोरियात लॉन्च झाली होती
व 2022 मध्ये ती भारतात लॉन्च करण्यात आलेली आहे. महत्वाचे म्हणजे या कारला 2023 साठीचा प्रतिष्ठित इंडियन कार ऑफ द इयरचा पुरस्कार देखील देण्यात आला आहे.
किया केरेन्स कारची वैशिष्ट्ये
ही कार प्रीमियम तसेच प्रेस्टीज,प्रेस्टीज प्लस,लक्झरी आणि लक्झरी प्लस अशा पाच ट्रिम मध्ये येते. तसेच या कारमध्ये अनेक लक्झरी वैशिष्ट्ये देण्यात आली असून सीटिंगमध्ये देखील उत्तम आहे. यातील स्मार्टस्ट्रीम 1.5 पेट्रोल, स्मार्ट स्ट्रीम 1.4 T-GDI पेट्रोल आणि 1.5 CRDI VGT डिझेल हे तीन पावर ट्रेन पर्याय आहेत.
हे वाहन प्रीमियम ते लक्झरी ट्रिम मध्ये सात सीटर पर्यायांसह दिले जाते. या कारमध्ये लक्झरी प्लस ट्रिम सह आणि सात सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये येते. या कारची रचना अतिशय आधुनिक आणि आकर्षक असून यामध्ये मोठे हेडलॅम्प, रुंद लोखंडी जाळी आणि आकर्षक बोनेट देण्यात आले आहे.
साईड प्रोफाइल्स पोर्टी लूक असून त्यासोबतच मोठ्या चाकांच्या कमानी आणि टेलगेट देखील वैशिष्ट्यपूर्ण अशी आहेत. तसेच या कारच्या मागच्या बाजूला एलईडी टेल लाइट्स आणि एलईडी टेल लॅम्प बार देण्यात आला आहे.
या कारचे इंजिन कसे आहे?
किया कॅरेन्स ही दोन इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाते. यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह 115 पीएस पावर आणि 144 एनएम टॉर्क जनरेट करते.1.4 लीटर टर्बोचार्ज केलेल्या पेट्रोल इंजिन असून जे 140 पीएस पावर आणि 242 एनएम टॉर्क जनरेट करते.
हे दोन्ही इंजिन पर्याय सहा स्पीड मॅन्युअल किंवा सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ऑफर केले जातात. भारतामध्ये 2022 या वर्षी लॉन्च झालेल्या की या कार्नीव्हल सात एमपीव्ही असून ती 2.2 लिटर डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 202 पीएस पावर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करते. आठ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे.
किती आहे या कारची किंमत?
किया कॅरेन्स ही चांगल्या प्रकारे डिझाईन केलेली वैशिष्ट्यपूर्ण अशी सात सीटर एमपीव्ही कार असून ती आधुनिक वैशिष्ट्ये आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते. या कारची किंमत दहा लाख 29 हजार रुपया पासून सुरू होते आणि 18 लाख 99 हजार रुपये पर्यंत जाते.