Flora Electric Scooter:- सध्या मोठ्या प्रमाणावर भारतीय बाजारामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसून येत असून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे आता ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेतच. परंतु इलेक्ट्रिक दुचाकी आणि आकर्षक वैशिष्ट्य असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर देखील अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलेली आहेत. अगदी याच पद्धतीने भारतीय ग्राहकांची मागणी डोळ्यासमोर ठेवून कोमाकी इलेक्ट्रिक या कंपनीने फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटर ही नव्या एडिशन म्हणजेच नवीन आवृत्तीत बाजारात लाँच केली असून
या स्कूटरचा आकर्षक लूक आणि मिळणारी उत्तम रेंज त्यामुळे ग्राहकांना ही स्कूटर पसंतीस पडताना दिसून येत आहे. या लेखात आपण फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये आणि किंमत इत्यादीबद्दल माहिती घेणार आहोत.
काय आहेत फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये?
कोमाकी कंपनीने लॉन्च केलेल्या फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये LIP04 प्रकारचा बॅटरी पॅक देण्यात आला असून त्यासोबत एक शक्तिशाली मोटर देण्यात आलेली आहे. या माध्यमातून ही स्कूटर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सक्षम आहे. ही फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही एकदा चार्ज करून 80 ते 100 किलोमीटर पर्यंत सहजपणे तिला चालवू शकतात.
या स्कूटरचा बॅटरी पॅक चार्ज करण्याकरिता स्कूटर सोबत एक चार्जर देण्यात आला असून त्याचा वापर तुम्ही करू शकतात. जर आपण पूर्ण चार्ज होण्याचा कालावधी पाहिला तर या स्कूटरला शून्य ते शंभर टक्के चार्ज होण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागतो.
या स्कूटरमध्ये पुरेशी जागा देण्यात आलेली असून यामध्ये तुम्हाला बॅग किंवा इतर कोणत्याही वस्तू सहजपणे ठेवता येऊ शकतात. तसेच सीटची रचना देखील बरीच लांब ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन व्यक्तींना आरामात या स्कूटरवर प्रवास करता येऊ शकतो.
तसेच मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांकरिता हेडरेस्ट आणि ग्रॅब रेल देण्यात आलेले आहे. तसेच या फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सीटखाली १८ लिटर बूट स्पेस देखील मिळते. तसेच पकड चांगली राहील या दृष्टिकोनातून उत्तम असा हँडलबार देण्यात आला असून इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने साऊंड सिस्टम दिला आहे
व तो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि रेडिओसह येतो. तसेच एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर याकरिता एक एसओएस बटन देण्यात आलेले आहे. तसेच एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डेटा टाईम रनिंग देखील देण्यात आला आहे.
याशिवाय क्रूज कंट्रोल आणि पार्किंग असिस्ट देखील देण्यात आला आहे. त्यामुळे ही स्कूटर सर्व वैशिष्ट्यांनी युक्त असून एक स्मार्ट स्कूटर बनण्यासाठी आवश्यक असलेली वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. तसेच कंपनीने या स्कूटरमध्ये तीन रायडिग मोड दिले
असून त्यामध्ये इको, पोर्ट आणि टर्बो मोड समाविष्ट आहे. तसेच या फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक सेंसर, वायरलेस अपडेट्स आणि एक स्मार्ट डॅशबोर्ड देण्यात आला आहे.
किती आहे फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत?
कोमाकी इलेक्ट्रिकने भारतातील या फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 69 हजार रुपये इतकी ठेवली आहे. यामध्ये आवश्यक ॲक्सेसरीजचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. ही स्कूटर भारतामध्ये तीन रंगाच्या पर्यायात लॉन्च करण्यात आली असून यामध्ये जेट ब्लॅक, गार्नेट रेड आणि सॅक्रामेंटो ग्रे या रंगाचा समावेश आहे.