7 Seater Car:- सध्या बाजारामध्ये अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या सेगमेंट मधील भन्नाट वैशिष्ट्य असलेल्या अनेक कार लॉन्च होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांचा आर्थिक बजेट व कारची गरज लक्षात घेऊन कार घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
परंतु बरेच व्यक्ती ही कार घेण्यासाठी जितक्या प्रमाणात बजेटचा विचार करतात तितकाच विचार हा कुटुंबातील सदस्यांचा देखील करतात. कारण सगळ्या कुटुंबातील सदस्यांना जर सोबत प्रवास करायचा असेल तर कुठली कार चांगली राहील? हा विचार प्रामुख्याने केला जातो व यामध्ये सात सीटर कार घेण्याला प्राधान्य दिले जाते.
यामध्ये इनोव्हा आणि एर्टिगा या तगड्या अशा सात सीटर कार आहेत. परंतु आता या दोन्ही कारला जबरदस्त स्पर्धा देईल अशी कार बाजारात लॉन्च करण्यात आलेली असून ही एमपीव्ही सेगमेंटमधील कार असून तिचे नाव आहे किया कॅरेन्स हे होय. याच कारबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.
बाजारात लॉन्च झाली सात सिटर असलेली किया करेन्स?
किया इंडियाने आपली प्रसिद्ध सात सीटर एमपीव्ही किया कॅरेन्सच्या नव्या डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडेलला लॉन्च केले आहे. या नव्या व्हेरियंटला नव्या पेंट स्कीम सोबत अनेक नवनवीन फीचर्स सह अपडेट करण्यात आले असून या नव्या व्हेरियंटमध्ये प्रेस्टीज(0), प्रेस्टीज+(0) आणि प्रीमियम(0) यांचा समावेश करण्यात आला आहे.
यातील जर आपण प्रीमियम(0) ची वैशिष्ट्ये पाहिली तर यामध्ये कीलेस एन्ट्री, आठ इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन, शार्क फिन अँटिना, स्टिअरिंग व्हील माउंटेड कंट्रोल आणि बर्गलर अलार्म देण्यात आला आहे. तसेच या कारच्या प्रेस्टीज(0) मध्ये सहा किंवा सात सीटर लेआउट, पुश बटन स्टार्टअप सह स्मार्ट की, लेदररेट गेअर नॉब,
रियर एलईडी लाइट्स, एलइडी डीआरएल आणि पोझिशनिंग लॅम्पचा पर्याय देण्यात आला आहे. तर प्रेस्टीज +(0) व्हेरियंट मध्ये ऑटोमॅटिक गेअरबॉक्स देण्यात आलेला असून त्यामध्ये एलईडी मॅप लॅम्प आणि रूम लॅम्प सह इलेक्ट्रिक सनरूफ देण्यात आले आहे.
याशिवाय किया कंपनीच्या माध्यमातून रेंज टॉपिंग एक्स लाईन ट्रिममध्ये डॅशकॅम फीचर देण्यात आले असून वाईस कमांडसह सर्व विंडो ऑपरेट करण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे.
किया कॅरेन्समध्ये मिळतात इंजिनचे तीन पर्याय
किया कॅरेन्समध्ये कंपनीच्या माध्यमातून इंजिनचे तीन पर्याय देण्यात आले असून यात 1.5 लिटर डिझेल इंजन, 1.5 लिटर नॅचरल एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
किती आहे या कारची किंमत?
किया कॅरेन्सने डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरियंटची सुरुवातीची किंमत बारा लाख 67 हजार रुपये ठेवली आहे. तसेच किया करेन्सची सुरुवातीची किंमत दहा लाख 52 हजार रुपये असून टॉप व्हेरियंटमध्ये ती 19 लाख 67 हजारापर्यंत जाते.