Maruti Suzuki Car: मारुतीच्या ‘या’ 3 कार आहेत महागड्या आणि आलिशान! परंतु ग्राहकांनी फिरवली पाठ, वाचा काय आहेत या तीनही कारची वैशिष्ट्ये

maruti invicto car

Maruti Suzuki Car:- मारुती सुझुकी ही देशातील एक प्रसिद्ध आणि अग्रगण्य कारनिर्मिती क्षेत्रातील कंपनी असून जर आपण फेब्रुवारी 2024 चा विचार केला तर विक्रीच्या दृष्टिकोनातून मारुती सुझुकीसाठी हा महिना उत्तम ठरला. जर वार्षिक आधारावर पाहिले तर आठ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.

परंतु मासिक आधारे जर पाहिले तर चार टक्के विक्रीचे नुकसान देखील झाले. सध्या मारुती सुझुकी देशामध्ये 17 कार मॉडेल्स विक्री करत असून त्यातील तीन मॉडेल्स अशा आहेत की ते खूप कमी प्रमाणामध्ये विकले गेलेत. यामध्ये मारुती सियाझ,

मारुती इनव्हीक्टो आणि मारुती जिम्नी या तीन मॉडेलचा समावेश आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यांमध्ये मारुती सुझुकीने या तीनही मॉडेल मिळून फक्त 1169 युनिटची विक्री केली आहे. तसे पाहायला गेले तर या तीनही कार महागड्या आणि आलिशान आहेत. परंतु तरीदेखील ग्राहकांनी या का तीनही कारच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

 वाचा या तीनही कारची वैशिष्ट्ये आणि डिटेल्स

1- मारुती सियाझ मारुती सुझुकीच्या या गाडीमध्ये  लक्झरी सेडान सियाजला नवीन सुरक्षा अपडेट दिले असून यामध्ये तीन नवीन ड्युअल टोन रंग देण्यात आले आहे. हे टोन रंगाचे पर्याय ब्लॅक ग्रुपसह पर्ल मेटॅलिक ऑप्युलंट रेड, ब्लॅक रूफसह पर्ल मेटॅलिक ग्रॅन्डुअर ग्रे

आणि ब्लॅक रूफसह डिग्निटी ब्राऊन असे असणार आहेत. तसेच हा नवीन प्रकार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची एक्स शोरूम किंमत 11 लाख 14 हजार रुपये तर टॉप व्हेरियंट करिता बारा लाख 34 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे.

मारुती सुझुकीने सियाजच्या या नवीन व्हेरिएंटच्या इंजिनमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. या नवीन व्हेरियंटला जुने 1.5 लिटर पेट्रोल इंजन देण्यात आलेले असून जे 103 बीएचपी पावर आणि 138 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि चार स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गेअर बॉक्सशी जोडलेले आहे.

दावा आहे की त्यांची ही मॅन्युअल एडिशन 20.65km/l पर्यंत मायलेज देते आणि ऑटोमॅटिक एडिशन 20.04km/l पर्यंत मायलेज देते. तसेच कंपनीच्या माध्यमातून या सियाज मध्ये 20 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत.

यामध्ये ड्युअल एअरबॅग, रेअर पार्किंग सेन्सर, ISOFIX चाइल्ड सीट अँकर तसेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन सारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.

2- मारुती इनव्हिक्टो या कारमध्ये वन टच पावर टेलगेट उपलब्ध असेल. म्हणजे साधा तुम्ही एक स्पर्श जरी केला तरी हे टेलगेट उघडेल. यात कंपनीच्या नेक्स्ट जनरेशन सुझुकी कनेक्टसह एअरबॅगची सुरक्षा मिळेल. 2.0 लिटर इंजिन इंटेलिजंट इलेक्ट्रिक हायब्रीड सिस्टमसह उपलब्ध असेल.

तसेच अशा परिस्थितीमध्ये या कारचे मायलेज देखील उत्कृष्ट असेल. पॅनोरमिक सनरूप आणि कॅप्टन सीट्स दुसऱ्या रांगेत उपलब्ध असतील व यामुळे कारमधील प्रवास प्रवाशांसाठी पूर्णपणे आरामदायी होईल.

या कारची लांबी 4,755mm आणि रुंदी 1850mm आणि उंची १७९५ एमएम आहे. या कारमध्ये रिक्लाइनीयिंग फ्रंट सीट्स, दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट्स, साईड फोल्डेबल टेबल, दुसऱ्या रांगेत सहज प्रवेश करण्यासाठी वन टच वाक इन स्लाईड,

मल्टी झोन तापमान सेटिंग्स आणि पॅनोरमिक स्लाइडिंग सनरूफ देखील मिळते. ही कार सात आणि आठ सीटर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

3- मारुती जिमनी जिमनी 1.5 लिटर चार सिलेंडर k15B सौम्य हायब्रीड पेट्रोल इंजिन द्वारे समर्थित आहे. जे 105 एचपीचे कमाल पॉवर आउटपुट आणि 134nm चे पिक टॉर्क निर्माण करते. हे पाच पीडीएमटी किंवा चार स्पीड एटी ट्रान्समिशनसह जोडलेले आहे.

Zeta व्हेरियंटमध्ये इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ओआरव्हीएम, वाशरसह फ्रंट आणि रियर वायपर, टेन नाईट आयआरव्हीएम, ड्रायव्हर साईड पावर विंडो ऑटो अप/ डाऊन पिंचगार्ड, रिक्लायनिंग फ्रंट सीट्स, माउंटेन कंट्रोल सह मल्टी फंक्शनल स्टेरिंग व्हिल, टिएफटी कलर डिस्प्ले अशी वैशिष्ट्ये आहेत.

या कारमध्ये स्टीलची चाके, ट्रिप रेल आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले कनेक्टिव्हिटीसह सात इंच स्मार्ट प्ले रोड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. अल्फाग्रेड अलोय व्हील, बॉडी रंगीत डोअर हँडल, वॉशर सह एलईडी ऑटो हेडलॅम्प,फॉग लॅम्प तसेच गडद हिरवा काच,

पुश बटन इंजिन स्टार्ट/स्टॉप, क्रुझ कंट्रोल, लेदर स्टेरिंग व्हिल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, नऊ इंच स्मार्ट प्ले प्रो टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देखील उपलब्ध आहे.

सुरक्षिततेकरिता स्टॅंडर्ड ड्युअल फ्रंट एअरबॅग, साईड आणि कर्टन एअर बॅग, ब्रेक लिमिटेड स्लीप डिफरेन्शियल इबिडी सह अँटी लॉक ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यासारखी इतर  वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe