New Holland Electric Tractor:- ट्रॅक्टर हे कृषी यंत्र शेतीसाठी खूप उपयुक्त असे यंत्र असून शेतीच्या पूर्व मशागतीपासून ते तयार शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवण्यापर्यंत ट्रॅक्टरचा वापर शेतकरी बंधू करत असतात. कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेमध्ये शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टर हे खूप फायदेशीर ठरते.
परंतु अलीकडच्या कालावधीत वाढलेल्या डिझेलच्या किमतीमुळे ट्रॅक्टरचा खर्च देखील आता शेतकऱ्यांना परवडण्याजोगा राहिलेला नाही. त्यामुळे आता काही कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या सेवेशी बाजारपेठेत देखील लॉन्च करण्यात आलेली आहेत.
अगदी याच पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आणि पसंत असलेल्या न्यू हॉलंड या कंपनीने देखील तुर्की येथील एका कृषी मेळावा मध्ये रोबोटिक ट्रान्समिशन असलेले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केले असून ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती करणे सोपे होणार असल्याचा दावा देखील
न्यू हॉलंड कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. हे एक कॉम्पॅक्ट साईजमध्ये असून इलेक्ट्रिक अर्थात विजेवर चालवण्यासाठी सक्षम आहे. या लेखामध्ये आपण या ट्रॅक्टरची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघणार आहोत.
काय आहेत न्यू हॉलंडच्या या रोबोटिक इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये?
न्यू हॉलंड कंपनीच्या माध्यमातून हे नव्याने विकसित केलेले ट्रॅक्टर असून या ट्रॅक्टरमध्ये कंपनीच्या माध्यमातून 75 किलोवॉटच्या बॅटरी देण्यात आलेल्या असून या बॅटरीला पावरफुल इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चालवण्याकरिता 800 व्होल्टची हाय कॅपॅसिटी देण्यात आलेली आहे.
यामध्ये दोन मोटर असून यातील एक मोटर चाकांच्या माध्यमातून कार्यान्वित होते तर दुसरी मोटर हायड्रोलिक आणि पावर टेक ऑफसह येते. 75 किलो वॅट क्षमतेच्या दोन बॅटऱ्या या ट्रॅक्टरला देण्यात आलेला असल्याने हे ट्रॅक्टर शेतीमध्ये अत्यंत प्रभावशाली पणे काम करण्यास सक्षम आहे.
तसेच कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरला रोबोटिक ट्रान्समिशन देण्यात आलेले आहे व यामुळे इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये गिअर बदलण्यासाठी सहाय्य मिळते व चालकाला अत्यंत आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो.
या ट्रॅक्टरला इलेक्ट्रिक ड्राइवच्या मदतीने किमान एक किमी प्रति तास इतका अधिकतम टॉर्क उपलब्ध होतो व याशिवाय तुम्हाला जर वेगात काम करायचे असेल तर 40 किमी प्रतितास मोड पर्यंत काम करण्याची सुविधा देखील कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेली आहे.
दोन आणि चार व्हील ड्राइव्हमध्ये येते हे ट्रॅक्टर
न्यू हॉलंड कंपनीने या नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला आकर्षक लूक दिलेला असून हे ट्रॅक्टर टू आणि फोर व्हील ड्राईव्हमध्ये उपलब्ध आहे. अगोदर कंपनीच्या माध्यमातून टू व्हील ड्राईव्ह मॉडेल विकसित करण्यात आलेले होते व त्यालाच पर्याय म्हणून आता फोर व्हील ड्राईव्ह रोबोटिक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आलेले आहे.