Preet 10049 Tractor: ‘हे’ आहे 100 एचपीचे भारतातील सर्वात शक्तिशाली ट्रॅक्टर! शेतकऱ्यांसाठी आहे वरदान, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
preet 10049 tractor

Preet 10049 Tractor:- भारत हा कृषीप्रधान देश आहे व भारतीय शेतकऱ्यांची शेतीसाठी असलेली ट्रॅक्टरची गरज पूर्ण करण्यासाठी अनेक कंपन्या ट्रॅक्टर निर्मिती करतात. याच ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रीत कंपनी ही देखील एक भारतातील अग्रगण्य ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे.

कंपनीच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी व शेतीसाठी उपयुक्त ठरतील असे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ट्रॅक्टर तयार केले जात आहे. जर आपण भारताचा विचार केला तर भारतीय बाजारपेठेमध्ये प्रीत या कंपनीचे अनेक ट्रॅक्टर मॉडेल सध्या उपलब्ध आहेत.

हे सगळे मॉडेल्स अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह  येतात. तुम्हाला देखील शेतीची कामे सहजरित्या आणि सुलभपणे करण्यासाठी पावरफुल ट्रॅक्टर हवे असेल तर तुम्ही प्रीत कंपनीच्या प्रीत 10049 या चार व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरची निवड करू शकतात. याच ट्रॅक्टर विषयीची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 प्रीत 10049 4WD ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

 प्रीत कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये 4087 सीसी क्षमतेचे चार सिलेंडर असलेले वॉटर कुल्ड इंजन पाहायला मिळते व ते शंभर एचपी पावर जनरेट करते. या ट्रॅक्टरमध्ये ड्राय टाईप इयर फिल्टर देण्यात आला आहे. कंपनीच्या या ट्रॅक्टरचे इंजिन 2200 आरपीएम जनरेट करते.

प्रीत ट्रॅक्टरमध्ये 67 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली असून या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 2400 किलोग्रॅम इतकी ठेवण्यात आलेली आहे व या ट्रॅक्टरचे वजन 2800 किलोग्रॅम इतके आहे. हे ट्रॅक्टर अतिशय आकर्षक आणि अत्याधुनिक अशा स्टायलिश लुकमध्ये सादर करण्यात आले आहे.

प्रीत कंपनीचा हा शंभर एचपीचा ट्रॅक्टर 2340 एमएम व्हिलबेसमध्ये तयार करण्यात आला असून त्याचा ग्राउंड क्लिअरन्स 470 एमएम आहे. तसेच या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला पावर टाईप स्टेरिंग पाहायला मिळते व जी तुम्हाला स्मूथ ड्राईव्ह पुरवते.

या ट्रॅक्टरमध्ये बारा फॉरवर्ड+ बारा रिव्हर्स गिअरसह गिअर बॉक्स आहे. तसेच या ट्रॅक्टरमध्ये ड्युअल टाईप क्लच आहे आणि तो सिंक्रोमॅश ट्रान्समिशसह येतो. हा ट्रॅक्टर मल्टी डीस्क इमरस्ड ब्रेकसह येतो.जो शेतीतील अत्यंत निसरड्या पृष्ठभागावर देखील मजबूत पकड ठेवू शकतो.

हे ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्ह मध्ये येतो. या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 0.65 ते 40.25 किमी प्रति तास आणि रिव्हर्स स्पीड 0.55 ते 30.79 किमी प्रति तास इतका ठेवण्यात आलेला आहे.

 किती आहे प्रीत 10049 4WD ट्रॅक्टरची किंमत?

 कंपनीच्या या ट्रॅक्टरची भारतात एक्स शोरूम किंमत 18 लाख 80 हजार ते वीस लाख 50 हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे. तसेच आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे या प्रीत ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलू शकते. शेतकरी या शंभर एचपी शक्तिशाली ट्रॅक्टरच्या मदतीने शेती आणि व्यावसायिक कामे अगदी सुलभतेने करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe