तुम्हालाही तुमच्या कारसाठी व्हीआयपी नंबर घ्यायचा आहे का? पण कसा घेतात हा नंबर? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

प्रत्येकाला स्वतःची कार घ्यायची इच्छा असते व जेव्हा कार किंवा कुठलेही वाहन खरेदी केली जाते तेव्हा कारसाठी किंवा जे ही आपण घेतो त्याकरिता बऱ्याच जणांचा आग्रह असतो की त्यांना फॅन्सी नंबर मिळावा. कारण जे हौशी वाहनमालक असतात

त्यांना त्यांच्या वाहनांच्या प्रत्येक बाबतीत खूप काळजी असते व अनेक प्रकारची सजावटी पासून तर वाहन आकर्षक दिसावे याकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना ते कायम करत असतात. त्यातीलच एक महत्त्वाचा विषय म्हणजे वाहनासाठी किंवा कारसाठी व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर्स घेणे हा होय.

कारण प्रत्येकाला गाडीचा नंबर युनिक असावा अशी इच्छा असते व याकरता बरेच व्यक्ती हवे तेवढे पैसे द्यायला देखील तयार असतात. परंतु आपल्याला जर फॅन्सी नंबर घ्यायचा असेल तर तो कसा मिळतो याबाबत बऱ्याच जणांना अजून माहिती नसेल.

परंतु जर आपण फॅन्सी नंबर मिळवण्यासाठीची प्रक्रिया बघितली तर यामध्ये अशा नंबरचा लिलाव केला जातो व या लिलावामध्ये जो जास्त बोली लावतो त्या व्यक्तीला तो फॅन्सी नंबर दिला जातो. त्यामुळे हा ई लिलाव कसा असतो किंवा त्याची प्रक्रिया कशी असते? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

 फॅन्सी नंबर कसा घ्यावा?

1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला(वेबसाईट)भेट देणे गरजेचे आहे.

2- त्या ठिकाणी पब्लिक युजर म्हणून लॉगिन आणि रजिस्टर करून घ्यावे.

3- त्यानंतर साईन अप प्रक्रिया पूर्ण करावी व आपल्या अकाउंटमध्ये परत लॉगिन करावे.

4- त्यानंतर फॅन्सी नंबरच्या यादी मधून एखादा नंबर निवडावा.

5- नंबर निवडल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी जे शुल्क आवश्यक आहे ते भरून तुमचा नंबर आरक्षित म्हणजेच रिझर्व करून घ्यावा.

6- त्यानंतर आपल्या आवडीच्या व्हीआयपी नंबर साठी बोली लावावी.

7- लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या लिलावामध्ये विजेत्या ठरलेल्या व्यक्तींची घोषणा केली जाते व तुमची बोली जर सर्वात जास्त असेल तर बाकीचे पैसे भरून तुम्ही तो नंबर मिळवू शकतात.

8- समजा तुम्हाला यामध्ये जर अलॉटमेंट झाली नाही तरी तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जे काही शुल्क भरलेले असते ते तुम्हाला परत परत मिळते.

 महत्त्वाचे

तसे पाहायला गेले तर प्रत्येक राज्यांमध्ये व्हीआयपी कार नंबरसाठी एक विशिष्ट किंमत म्हणजेच बेस प्राईस ही ठरलेली असते व या ई लीलाव प्रक्रियेमध्ये सुरू होणारी बोली या बेस प्राईस पासून सुरू होते. विशेष म्हणजे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे व त्यामुळे तुम्हाला आरटीओ कार्यालयामध्ये देखील जाण्याची गरज भासत नाही.