Top 2 Mini Tractor:- मोठ्या ट्रॅक्टर ऐवजी अनेक शेतकरी आता मिनी ट्रॅक्टर घेण्याला पसंती देत असून पेरणी आणि आंतर मशागतींच्या कामांसाठी हे ट्रॅक्टर सोयीस्कर आणि सुरक्षित असतात. परंतु शेतीकामांकरिता शेतकऱ्यांना शक्तिशाली अशा परवडणाऱ्या किमतीतील मिनी ट्रॅक्टरची आवश्यकता असते.
या अनुषंगाने अनेक ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांनी प्रगत तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक वैशिष्ट्ये असलेले अनेक मिनी ट्रॅक्टरचे मॉडेल बाजारामध्ये लॉन्च केलेले आहेत.जे शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी सक्षम आहेत.
या अनुषंगाने आपण वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या दोन मिनी ट्रॅक्टर मॉडेलची माहिती घेणार आहोत. जे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे असे ट्रॅक्टर आहेत.
महिंद्राचे शक्तिशाली मिनी ट्रॅक्टर
1- महिंद्रा युवराज 215 NXT- हे भारतातील 15 एचपी श्रेणीतील सर्वात लोकप्रिय मिनी ट्रॅक्टर असून या ट्रॅक्टरमध्ये 15 एचपी श्रेणीचे शक्तिशाली इंजिन, एक सिलेंडर व ८६३.५ सीसी क्षमतेचे आहे. जे 2300 आरपीएमची मजबूत पीक पावर जनरेट करते.
शेतीशी कामे कार्यक्षमतेने करण्यासाठी या ट्रॅक्टरची इंजिन 48 न्यूटन मीटरची कमाल टॉर्क पॉवर निर्माण करते. इंजिन स्वच्छ आणि नीटनेटके रहावे याकरिता यामध्ये एअर फिल्टर आणि वॉटर कुल्ड कुलिंग सिस्टम देण्यात आले आहे.
या मिनी ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला सिंगल फ्रिक्शन प्लेट क्लचसह साईड शिफ्ट स्लाइडिंग मेस ट्रान्समिशन ( गियरबॉक्स)मिळते. ज्यामध्ये गरजेनुसार सहा फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स स्पीड गिअर पर्याय देण्यात आले आहेत.
मेकॅनिकल पावर स्टेरिंग तसेच ड्राय डिस्क ब्रेक आणि 19 लिटर क्षमतेची इंधन टाकी हे याचे विशेष वैशिष्ट्य आहेत. या ट्रॅक्टरची श्रेणी ll हेवी ड्युटी तीन पॉईंट लिंकेज शेतकऱ्यांना आवडती अवजारे ट्रॅक्टरला जोडण्याची क्षमता देते. तसेच या ट्रॅक्टरचे हायड्रोलिक क्षमता 778 किलो इतकी आहे.
किती आहे किंमत?
महिंद्रा युवराज 215 NXT या मिनी ट्रॅक्टरची किंमत तीन लाख वीस हजार ते तीन लाख 40 हजार रुपये असून या ट्रॅक्टरवर शेतकऱ्यांना 2000 तास किंवा दोन वर्षाची वारंटी मिळते.
2- महिंद्रा जीवो 245 DI- महिंद्राचा हा मिनी ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्हमध्ये असून महिंद्राच्या मिनी ट्रॅक्टर श्रेणीतील शक्तिशाली असा 22 एचपीचा ट्रॅक्टर आहे.
यामध्ये दोन सिलेंडर आणि तेराशे 66 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले असून त्याकाराने लहान आणि कार्यक्षमतेने मात्र खूप मोठे आहे. या ट्रॅक्टरची इंजिन 2300rpm आणि 81 न्यूटन मीटरची कमाल टॉर्क पॉवर जनरेट करते यामुळे ते शेतीतील प्रत्येक कामासाठी उपयुक्त ठरते.
या ट्रॅक्टरमध्ये सिंगल क्लचसह स्लाइडिंग मेश गिअर बॉक्स देण्यात आला आहे. त्यामध्ये 8 फॉरवर्ड आणि चार रिव्हर्स गिअर पर्याय मिळतात. तसेच या ट्रॅक्टरला ऑइल एमर्स ब्रेक देण्यात आलेले आहेत. या मिनी ट्रॅक्टरमध्ये पावर स्टेरिंग असून काम करताना ड्रायव्हरला चांगले कंट्रोल ठेवणे शक्य होते.
या ट्रॅक्टरचे हायड्रोलिक क्षमता 750 किलोपर्यंत आहे. तसेच या ट्रॅक्टरमध्ये ड्राय टाइप एअर फिल्टर आणि वॉटर कुल्ड कूलिंग सिस्टम देण्यात आलेली आहे. या ट्रॅक्टरला कल्टीवेटर, ट्रेलर, रोटावेटर आणि सीड ड्रिल यासारख्या अवजारे जोडता येतात.
किती आहे महिंद्रा जिवो 245 DI ट्रॅक्टरची किंमत?
या मिनी ट्रॅक्टरची किंमत पाच लाख तीस हजार ते पाच लाख 45 हजार रुपये आहे.