Sonalika Electric Tractor: विसरा डिझेलचे टेन्शन आणि घ्या सोनालिकाचा ‘हा’ इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
sonalika electric tractor

Sonalika Electric Tractor:- शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणावर सध्या केला जातो. शेतीची पूर्व मशागती पासून तर पिकांच्या काढणीपर्यंतच्या अनेक कामांकरिता ट्रॅक्टरचा वापर अनेक कामांसाठी होत असतो. ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतीतील बरीच कामे कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी खर्चात करता येणे शेतकऱ्यांना शक्य झालेले आहे.

परंतु गेल्या काही वर्षापासून डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आता ट्रॅक्टरचा वापर देखील शेतकऱ्यांना परवडण्याजोगा राहिलेला नाही. ट्रॅक्टरच्या वापराकरिता देखील आता डिझेल पोटी शेतकऱ्यांना बराच खर्च करावा लागतो.

त्यामुळे आता कार किंवा दुचाकी सारख्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीप्रमाणे काही कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या वापरामुळे आता शेतकऱ्यांना डिझेलवरील खर्च करण्याची गरज नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होताना दिसून येत आहे.

इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या निर्मितीमध्ये सोनालिका कंपनीने आघाडी घेतली असून त्यांनी तीन वर्षांपूर्वीच सगळ्यात प्रथम इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची निर्मिती केली.

या लेखात आपण सोनालिकाचा टायगर इलेक्ट्रिक 4 डब्ल्यूडी या छोट्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची माहिती घेणार आहोत. सोनालिका चा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेती कामांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

 काय आहे सोनालिकाच्या या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये?

सोनालिका कंपनीने हा ट्रॅक्टर 25.5 किलो वॅट क्षमता असलेल्या मोटरसह तयार केला असून जो 15 हॉर्स पावरची निर्मिती करतो. या ट्रॅक्टरला एकदा चार्ज केल्यानंतर जास्त वेळेपर्यंत काम करण्याची क्षमता देण्यात आलेली आहे.

सोनालिकाचा हा ट्रॅक्टर पूर्ण चार्ज होण्यासाठी चार तासांचा कालावधी लागतो व या ट्रॅक्टरला कंपनीच्या माध्यमातून पाचशे किलो वजन उचलण्याची क्षमता म्हणजेच हायड्रोलिक पावर देण्यात आलेली आहे. सोनालिका कंपनीने टायगर इलेक्ट्रिक 4 डब्लूडी या मिनी ट्रॅक्टरला 9.46 कमीत कमी एचपी पीटीओ पावरसह तयार केले.

त्यामुळे हे ट्रॅक्टर सर्व प्रकारचे कृषी उपकरणे चालवण्यासाठी कार्यक्षम आहे. तसेच या ट्रॅक्टरचा व्हिलबेस हा 1420 एमएम चा आहे. तसेच इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला पावर स्टेरिंग देण्यात आलेले असून यामुळे चालकाला स्मूथ ड्रायव्हिंगचा अनुभव येतो.

पुढच्या बाजूस सहा आणि मागच्या बाजूस दोन रिव्हर्स गिअरसह गिअर बॉक्स देण्यात आला आहे. या ट्रॅक्टरला कंपनीच्या माध्यमातून 24.93 किमी प्रति तास इतका वेग देण्यात आला असून हा चार व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला नॉर्मल मोडवर ठेवून दहा तासात चार्जिंग करता येऊ शकते तर फास्ट मोडवर ठेवून चार तासांमध्ये फुल चार्ज करता येतो.

 किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?

सोनालिका कंपनीने टायगर इलेक्ट्रिक 4 डब्ल्यूडी या मिनी ट्रॅक्टरची किंमत संपूर्ण देश पातळीवर पाच लाख 99 हजार ते सात लाख रुपये दरम्यान निश्चित केलेली असून आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे काही राज्यांमध्ये किमतीत बदल होऊ शकतो. तसेच कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरला पाच हजार किलोमीटर किंवा पाच वर्ष जे आधी पूर्ण होईल इतकी वॉरंटी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe