भारतीय ऑटोमोबाईल म्हणजेच वाहन बाजारपेठ खूप मोठी असून यामध्ये मोठमोठ्या कंपन्यांची वाहने लॉन्च होताना आपल्याला दिसतात. अनेक प्रकारच्या कार तसेच बाईक, कमर्शियल अर्थात व्यावसायिक वाहने आणि अवजड वाहनांचा यामध्ये आपल्याला समावेश दिसून येतो. भारतीय वाहन बाजारपेठ म्हणजेच ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे.
त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या वाहनाची खरेदी करायची असेल तर भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेमध्ये भरपूर असे पर्याय उपलब्ध आहेत. आता जर आपण वाहनांच्या बाबतीत बघितले तर एलसीव्ही सेगमेंट मधील वाहने हे प्रामुख्याने व्यावसायिक वापरासाठी जास्त करून विकत घेतले जातात.
वाहनांच्या माध्यमातून छोट्या मोठ्या वस्तूंची ने आण करून एक व्यवसाय उभारता येतो व त्या माध्यमातून एक उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेला पैसा आपल्याला मिळवता येतो.
अशा प्रकारच्या वाहनांचा वापर हा लॉजिस्टिक कंपनीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे तुम्हाला देखील अशा प्रकारे एलसीव्ही सेगमेंट मधील एखादे वाहन खरेदी करायची आहे व स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर भारतातील महत्त्वाच्या असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा ने नुकतेच कमर्शियल वाहन सेगमेंट मध्ये महिंद्रा वीरो एलसीव्ही लॉन्च केली आहे. याच वाहनाबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.
महिंद्राने लॉन्च केलेल्या विरोचे काय आहेत खास फीचर्स?
कंपनीने हे वाहन तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केले असून यामध्ये अनेक आकर्षक असे फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामध्ये ड्रायव्हर सीट स्लाईड आणि रिक्लाईन तसेच फ्लॅट फोल्ड सीड्स, मोबाईल डॉक, डोअर आर्मरेस्ट, पियानो ब्लॅक क्लस्टर डिझेल,
ड्रायव्हर एअर बॅग, एसी आणि हिटर, फास्ट चार्जिंग यूएसबी सी टाईप, 26.03 सेंटीमीटर टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, रिवर्स पार्किंग कॅमेरा इत्यादी आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आलेले असून पावर विंडो आणि स्टेरिंग माउंटेड कंट्रोल्स सारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आलेली आहे.
कसे आहे विरोचे इंजिन?
महिंद्रा कंपनीने या वाहनांमध्ये डिझेल आणि सीएनजी असे दोन्ही पर्याय दिले आहेत. यामध्ये 1.5-लिटर mDI डिझेल इंजन दिलेले असून ते 59.7 KW ची पावर आणि 210 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. तसेच सीएनजी व्हेरिएंटचे इंजिन 67.2 KW ची शक्ती आणि 210 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते.
विरोची इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये
महिंद्रा कंपनीने हे वाहन स्टॅंडर्ड डेक आणि हायडेक व सीबीसी कार्गोसाठी खास डिझाईन केलेले असून ज्याचे साईज XL 2765 एमएम आणि XXL 3035 एमएम इतकी असून डिझेलमध्ये त्याची भार उचलण्याची क्षमता 1.6 टन आणि 1.55 टन आहे. तर सीएनजी व्हेरियंटची क्षमता दीड टन आणि 1.4 टन आहे.
किती आहे महिंद्रा विरोची किंमत?
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेल्या महिंद्रा विरोची सुरुवातीचे एक्स शोरूम किंमत सात लाख 99 हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेले आहे व या किमतीत V2 CBC XL व्हेरियंट उपलब्ध करण्यात आलेले आहे. तर या वाहनाच्या V6 SD XL व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 56 हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे.