Tata Electric Car : भारतात इलेक्ट्रिक कारचे मार्केट दिवसेंदिवस विस्तारत आहे. देशात इलेक्ट्रिक कारला मोठी मागणी आली आहे. देशातील विविध ऑटो कंपन्या आता नवनवीन इलेक्ट्रिक कार लाँच करत आहेत. दरम्यान जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे टाटा कंपनीने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कारवर मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. टाटा ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. टाटा कंपनीचे इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये वर्चस्व आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये या कंपनीचा मोठा बोलबाला पाहायला मिळतो. या सेगमेंटमध्ये कंपनीची मोठी हिस्सेदारी आहे.
या कंपनीने आतापर्यंत अनेक इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच केल्या आहेत. यात टाटा नेक्सन इलेक्ट्रिक एसयूव्ही चा देखील समावेश होतो. दरम्यान कंपनीने याच लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV वर बंपर डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. यानुसार Tata Nexon SUV वर तब्बल 2.80 लाख रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
या इलेक्ट्रिक कारच्या 2023 च्या मॉडेलवर सर्वात जास्त डिस्काउंट ऑफर मिळत आहे. स्टॉक क्लिअर करण्यासाठी कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि ही डिस्काउंट ऑफर 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जर स्वस्तात ही लोकप्रिय इलेक्ट्रिक कार घरी आणायची असेल तर लवकरात लवकर याची खरेदी करावी लागणार आहे. दरम्यान, आता आपण या इलेक्ट्रिक SUV वर मॉडेलनुसार किती डिस्काउंट मिळत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
व्हेरिएंटनुसार किती डिस्काउंट मिळतोय
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा डीलर्स प्री-फेसलिफ्ट Nexon EV च्या उर्वरित स्टॉकवर ही सवलत देत आहेत. या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या 2023 मॉडेलच्या प्राइम व्हेरिएंटवर तुम्हाला 1.90 लाख ते 2.30 लाख रुपयांचा डिस्काउंट ऑफरचा लाभ दिला जाणार आहे. टॉप-स्पेक Nexon EV Max वर 2.80 लाख रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
या इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 16.49 लाख रुपये एवढी आहे. आता New Nexon EV च्या Fearless LR वेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर, यावर 85,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. त्याच वेळी, टॉप-स्पेक Fearless Plus S LR वर 1 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध होणार आहे. दरम्यान या Nexon EV फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत 14.74 लाख रुपये एवढी आहे.
तसेच कंपनी नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्टच्या फियरलेस एमआर, एम्पॉवर्ड + एलआर आणि एम्पॉवर एमआर व्हेरियंटवर 50,000 रुपयांची सूट ऑफर करत आहे. शिवाय, त्याच्या Fearless + MR, Fearless + S MR, Fearless + LR प्रकारांवर 65,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर दिली जात आहे.