Tata Nexon CNG: टाटा लवकरच आणणार CNG मध्ये ‘ही’ कॉम्पॅक्ट SUV कार! करता येईल सीएनजी ते पेट्रोल मोडमध्ये शिफ्ट,वाचा वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
tata nexon cng

Tata Nexon CNG:- सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असून वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बाइक तसेच अनेक नामांकित कंपन्यांकडून इलेक्ट्रिक कारची निर्मिती देखील करण्यात येत आहे.

यामध्ये भारतातील प्रथितयश  आणि नामांकित टाटा मोटर्स देखील मागे नाही. सध्या टाटा मोटर्सच्या माध्यमातून आपल्या मॉडेल्समध्ये सातत्याने सीएनजीचा पर्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे व याचाच भाग म्हणून टाटा ने टाटा टियागो आणि टिगोर हे सीएनजी मॉडेल सादर केले आहेत.

परंतु आता याही पुढे जात टाटा मोटर्सने त्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे म्हणजेच नेक्सनचे सीएनजी व्हर्जन सादर करण्याची तयारी केलेली असून नुकताच 2024 इंडिया मोबिलिटी शो नवी दिल्ली येथे पार पडला व त्यामध्ये ही कार सादर करण्यात आलेले होती.

 कधी होऊ शकते लॉन्च?

नेक्सान सीएनजी व्हर्जन ही या सेगमेंट मधील पहिली टर्बो पेट्रोल सीएनजी कार असून ती मारुती सुझुकीच्या ब्रेझा या सीएनजीला तगडी टक्कर देईल अशी शक्यता आहे. नेक्सन सीएनजी वर्जन नेमके कधी लॉन्च केले जाणार आहे याची तारीख अजून देखील समोर आलेली नाही.

परंतु साधारणपणे दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या आसपास हे नवे मॉडेल लॉन्च केले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच यावर्षी नेक्सन सीएनजी  लॉन्च केले जाणार असल्याची माहिती देखील टाटा मोटर्सने दिलेली आहे.

 देण्यात आली आहे ट्विन सीएनजी सिलेंडर टेक्नॉलॉजी

या सीएनजी कार मध्ये टाटाची नाविन्यपूर्ण अशी ट्वीन सीएनजी सिलेंडर टेक्नॉलॉजी देण्यात आली असून यासह 1.2 लिटर, तीन सिलेंडर टर्बो चार्ज पेट्रोल इंजन आहे. परंतु कंपनीच्या माध्यमातून मायलेज आणि पावरचे आकडे मात्र जाहीर करण्यात आलेले नाहीत.

यामध्ये जे ट्विन सीएनजी सिलेंडर टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे त्याचा सेटअप टियागो आणि टिगोर सीएनजी मध्येही देण्यात आला आहे.

यामध्ये बूट फ्लॉवरच्या खाली दोन सीएनजी सिलेंडरचे टॅंक ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बूट स्पेसचे फारसे नुकसान होत नाही व कारच्या तळाशी स्पेअर व्हिल ठेवण्यात आले आहे.

 होणार सीएनजी ते पेट्रोल मोडमध्ये फास्ट शिफ्ट

सादर करण्यात आलेल्या या सीएनजी नेक्सनची स्टायलिंग ही नियमित पेट्रोल आणि डिझेल नेक्सन सारखीच असून सीएनजी ते पेट्रोल मोडमध्ये वेगात शिफ्ट होता यावे याकरिता एसयुव्ही सिंगल ईसीयुसह येते. टाटा नेक्सन थेट सीएनजी मोड मध्ये देखील सुरू होऊ शकते व यात इंधन फंक्शन दरम्यान ऑटो स्विच देण्यात आला आहे.

 किती असू शकते या नेक्सन सीएनजीची किंमत?

या नेक्सन सीएनजी ची किंमत साधारणपणे 10 लाख 50 हजार ते 18 लाख 50 हजार( ऑन रोड, मुंबई) असण्याची शक्यता आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe