Tata Punch Camo:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर टाटा मोटर्स तसेच महिंद्रा अँड महिंद्रा इत्यादी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर विविध वैशिष्ट्य असलेल्या कार उत्पादित केल्या जात आहेत.
त्यामुळे ग्राहकांना आता वेगवेगळ्या सेगमेंटमधील कारचे पर्याय उपलब्ध झालेले आहेत. अगदी याच पद्धतीने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटरची सर्वाधिक विक्री होणारी टाटा एसयुव्ही पंच ही कार असून आता टाटा एसयुव्ही पंचची नवीन स्पेशल एडिशन लॉन्च करण्यात आले असून त्याचे नाव टाटा पंच कॅमो स्पेशल एडिशन असे आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर टाटा पंचची ही स्पेशल एडिशन आल्यामुळे आता ग्राहकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. कंपनीच्या माध्यमातून या कारमध्ये अनेक नवनवीन असे फीचर्स समाविष्ट करण्यात आले असून या कारचा लुक अतिशय अप्रतिम असा बनवण्यात आलेला आहे.
ही कार नवीन सिविड गीन कलर मध्ये असून व्हाईट रूफ असलेली एक छोटी एसयूव्ही कार असणार आहे. त्यामुळे या लेखात आपण या कारची किंमत आणि तिच्यात असलेले फीचर्स बघणार आहोत.
काय आहेत टाटा पंचक कॅमो स्पेशल एडिशनचे फीचर्स?
जर टाटा पंच या स्पेशल एडिशनबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये R16 चारकोल ग्रे अलॉय हिल आणि त्यामुळे तीन पॅटर्नसह प्रीमियम अपहोलस्ट्री देण्यात आले असून फर्स्ट इन सेगमेंटमधील 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे.
जे वायरलेस अँड्रॉइड ऑटो एप्पल कार प्ले ला सपोर्ट करेल. तसेच या कारमध्ये वायरलेस चार्जर, रियर एसी व्हेंट्स तसेच फास्ट सी टाईप यूएसबी चार्जर, आर्मरेस्ट सह मोठा कन्सोल या सह इतर फीचर्स देण्यात आले आहेत.
या कारमध्ये 1199 सीसी पेट्रोल इंजिन देण्यात आले असून जे 87 बीएचपी पावर आणि 115 न्यूटन मीटरचा पिक टॉर्क जनरेट करते. जर आपण या टाटा पंच केमोचे मायलेज बघितले तर ते 20.09 किलोमीटर पर लिटर इतके आहे. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.
किती आहे टाटा पंच कॅमो स्पेशल एडिशनची किंमत?
टाटा पंच कॅमो स्पेशल एडिशनची एक्स शोरूम किंमत आठ लाख 44 हजार 900 रुपयांपासून सुरू होते.