Tata SUV: टाटाची ‘ही’ स्वस्तातली SUV बाजारामध्ये करत आहे धुम! आकर्षक वैशिष्ट्य असलेली ही कार आहे ग्राहकांची पहिली पसंती, किंमत फक्त…

Ajay Patil
Published:
tata suv

Tata SUV:- टोयोटा, टाटा, मारुती सुझुकी यासारख्या कार उत्पादक कंपन्या  भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एसयूव्ही कार निर्मितीमध्ये अग्रस्थानी आहेत. या तीनही कंपन्यांच्या कारमध्ये एकमेकांशी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा दिसून येते. या तीन कंपन्यासोबत ह्युंदाई ही कंपनी देखील स्पर्धेत या कंपन्यांसोबत टिकून आहे.

या कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळे मॉडेल्स आणि वैशिष्ट्य असलेल्या कार्स बाजारपेठेमध्ये आणल्या जात असून ग्राहकांच्या पसंतीस उतरताना देखील त्या दिसत आहेत. यामध्ये जर आपण एसयूव्ही कारचे अनुषंगाने पाहिले तर सध्या टाटा नेक्सन, मारुतीची ब्रेझा आणि ह्युंदाईची क्रेटा  या कार याआधीच बाजारामध्ये दबदबा निर्माण करून आहेत.

परंतु या तीनही प्रकारच्या एसयूव्हीच्या मानाने तब्बल फेब्रुवारी 2024 मध्ये 18 हजार 438 युनिटच्या विक्रीसह टाटाची पंच ही अग्रस्थानी राहिली आहे. म्हणजेच या कारची सर्वाधिक विक्री सध्या एसयुव्ही सेगमेंटमध्ये झाली आहे. या कार नंतर ब्रेजा तिचे स्थान टिकवून आहे.

 काय आहेत टाटाच्या पंचमध्ये खास वैशिष्ट्ये?

 ही एक मायक्रो एसयूव्ही कार असून भारतामध्ये मायक्रो एसयूव्ही सेगमेंट प्रसिद्ध करण्यात या कारची खूप महत्त्वाची भूमिका आहे. ही कार साधारणपणे ऑक्टोबर 2021 मध्ये लॉन्च करण्यात आलेली होती व तेव्हापासून वेगाने तिने बाजारपेठ काबीज केले व आज सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.

ही पाच सीटर मायक्रो एसयुव्ही कार असून तिचे 1.2- लिटर पेट्रोल इंजन 86 पीएस आणि 113 एनएम जनरेट करते व सीएनजी वर आउटपुट कमी होते. सीएनजी मध्ये ते 77 पीएस आणि 97 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार पाच स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स पर्याय आहे.

 किती देते ही कार मायलेज?

 टाटा पंच सीएनजी व्हेरियंट हे 26.99 किमी प्रति किलो पर्यंत मायलेज देते तर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकार हा 20.09 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. त्यासोबतच पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन प्रकार हा 18.8 Kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते.

या कारमध्ये 7.0 इंचाचा टच स्क्रीन सिस्टम, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑटोमॅटिक हेडलाइट्स आणि वायपर्स, ऑटो एसी आणि क्रूझ कंट्रोल इत्यादी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत.

 किती आहे या कारची किंमत?

 टाटा पंच या मायक्रो एसयूव्हीची किंमत सहा लाख रुपये पासून ते नऊ लाख 47 हजार रुपयांपर्यंत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe