Top 3 John Deere Tractor:- भारतामध्ये अनेक ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून त्यामध्ये जॉन डीरे ही कंपनी देखील उत्कृष्ट कृषी उपकरणे तयार करण्यासाठी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे.
जर आपण जॉन डीअर कंपनीच्या ट्रॅक्टरचा विचार केला तर यामध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञान तसेच अपडेट डिझाईन व अनेक प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या कायम पसंतीस या कंपनीचे ट्रॅक्टर राहिलेले आहेत.
जर आपण जॉन डीरे या ट्रॅक्टर कंपनीचा विचार केला तर या कंपनीच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेमध्ये विविध सिरीजमध्ये ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत व ते शेतीच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहेत.
तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून देखील हे ट्रॅक्टर खूप प्रगत आहेत. तसेच कार्यक्षम इंजिनसह येतात. जर तुम्हाला शेती किंवा इतर व्यवसाय कारणांकरिता जॉन डीअर ट्रॅक्टर खरेदी करायचे असेल तर या लेखामध्ये आपण तीन महत्त्वाच्या अशा जॉन डियर ट्रॅक्टरबद्दल माहिती घेणार आहोत.
ही आहेत जॉन डियर कंपनीचे तीन वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे ट्रॅक्टर
1- जॉन डियर 6120 बी ट्रॅक्टर- या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 4000cc क्षमतेचे शक्तिशाली चार सिलेंडर इंजन पाहायला मिळते व त्या माध्यमातून 120 एचपी पावर जनरेट केली जाते. या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 102 एचपी आहे आणि त्याचे इंजिन 2400 आरपीएम इतकी आहे.
जॉन डियर 6120 बी ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 3650 किलोग्रॅम इतकी आहे. या ट्रॅक्टर मध्ये पावर स्टेरिंग देण्यात आलेली असून बारा फॉरवर्ड+ चार रिव्हर्स गिअर सह एक गिअर बॉक्स पाहायला मिळतो. हा चार व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे.
किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?
जॉन डियर 6120 बी ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत 32 लाख 50 हजार ते 33 लाख 90 हजार रुपये आहे. कंपनीने या ट्रॅक्टरची 5000 तास किंवा पाच वर्षाची वारंटी देण्यात आली आहे.
2- जॉन डियर 5039 डी पावरप्रो ट्रॅक्टर- या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला तीन सिलेंडर कुलंट कुल्ड इंजिन मिळते. जे 41 एचपी पावर जनरेट करते. पावर प्रो ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 35 एचपी आहे व त्याची इंजिन 2100 आरपीएम जनरेट करते.
या ट्रॅक्टरचे हायड्रोलिक क्षमता सोळाशे किलो इतकी ठेवण्यात आलेली असून यामध्ये पावर स्टेरिंग देण्यात आलेली आहे. तसेच आठ फॉरवर्ड+ चार रिव्हर्स गियरसह गिअरबॉक्स देखील देण्यात आलेला आहे. हा ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्हमध्ये येतो.
किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?
जॉन डियर 5039 डी पावर प्रो ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत सहा लाख 55 हजार ते सात लाख दहा हजार रुपये इतकी असून ह्या ट्रॅक्टरला पाच वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.
3- जॉन डियर 5056E ट्रॅक्टर- या ट्रॅक्टरमध्ये तीन सिलेंडर ओव्हरफ्लो रिझर्वोअर इंजिनसह कुलंट केलेले इंजिन देण्यात आलेले असून जे 65 एचपी पावर जनरेट करते. या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 55.3 एचपी असून त्याची इंजिन 2400 आरपीएम जनरेट करते.
या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता दोन हजार किलोग्रॅम असून कंपनीने हा ट्रॅक्टर 2050mm व्हिलबेस मध्ये तयार केला आहे. तसेच या ट्रॅक्टरमध्ये नऊ फॉरवर्ड व तीन रिव्हर्स गिअर सह लॉकलॅच पावर स्टेरिंगसह 25 डिग्रीपर्यंत टिलटेबल सह एक गिअर बॉक्स पाहायला मिळतो. हा ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्ह मध्ये येतो.
किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?
जॉन डियर 5056E ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत बारा लाख दहा हजार ते बारा लाख 60 हजार रुपये इतकी आहे व कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरला पाच हजार तास किंवा पाच वर्षाची वारंटी देण्यात आलेली आहे.