तुमची ही गाडी कुठे धडकली आणि गाडीवर डेन्ट पडला आहे का? नका करू काळजी! करा हा घरगुती उपाय आणि काढा डेन्ट

Ajay Patil
Published:
dent on car

आपण जेव्हाही रस्त्यावर वाहन चालवत असतो तेव्हा आपण ते चालवत असताना आपल्या वाहनामुळे कोणाला धक्का लागेल किंवा एखाद्या गाडीला ते धडकणार नाही याबाबत पुरेपूर काळजी घेत असतो. परंतु बऱ्याचदा एखाद्या वेळेस पार्किंगमध्ये गाडी लावलेली असते व गाडी आपल्याला काढायची असते अशावेळी गाडी रिव्हर्स घेताना चुकून एखाद्या गाडीला धक्का लागतो

व गाडीचा काही भाग दाबला जातो. तसेच वाहन चालवताना कितीही काळजी घेतली तरी दुसऱ्याच्या चुकीमुळे किंवा  आपल्यामुळे देखील नजरचुकीने थोड्याफार प्रमाणात एखाद्या गाडीला गाडी धडकते व गाडीचा काही भाग दाबला जातो म्हणजेच त्या ठिकाणी डेन्ट पडतो.

यामुळे गाडीचा तो दाबला गेलेला भाग दिसायला देखील चांगला दिसत नाही. त्यामुळे आपल्याला जर वाहनावरील डेन्ट काढायचा असेल तर गाडी गॅरेजला न्यावी लागते व त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच प्रमाणात खर्च येऊ शकतो.

परंतु जर एखादा घरगुती उपाय करून एकही रुपया खर्च न करता वाहनावरील डेन्ट काढता आला तर किती छान होईल. हो आता तुम्हाला एक रुपया खर्च न करता देखील गाडीवरील डेन्ट काढता येईल. याबद्दलचीच माहिती या लेखात घेऊ.

 हा उपाय करा आणि एक रुपया खर्च करता गाडीवरील डेन्ट काढा

1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्ही एका पातेल्यामध्ये पाणी घ्यावे व ते चांगले उकळून घ्यावे.

2- पाण्याला बुडबुडे येईपर्यंत ते उकळावे व असे पाणी गाडीवर ज्या ठिकाणी डेन्ट पडला आहे त्या ठिकाणी ते उकळते गरम पाणी हळूहळू ओतावे. परंतु ते अंगावर येणार नाही याची काळजी घ्यावी.

3- उकळते पाणी गाडीवर ओतून झाल्यावर टॉयलेट साफ करण्यासाठी जो काही प्लंजर  आपण वापरतो तो गाडीच्या डेन्टवर लावून आरामांमध्ये तुमच्या दिशेने ओढावा. ही क्रिया साधारण दोन ते तीन वेळा करून पहावी.

4- जोपर्यंत डेन्ट निघत नाही तोपर्यंत प्लंजरचा वापर करावा.

5- गरम पाणी आणि प्लंजर यांचा वापर करून तुम्ही काही मिनिटात गाडीवरील डेन्ट ताबडतोब काढू शकतात.

6- समजा गाडीच्या मागच्या बाजूवर डेन्ट पडला असेल तर त्यावर उकडलेले पाणी ओतून शक्य असेल तर गाडीच्या खालच्या भागातून ज्या ठिकाणी डेन्ट आहे तिथला भाग हाताने बाहेरच्या दिशेने ढकलावा.

यासंबंधीचा उपाय युट्युब वरील @AdamWasHere नावाच्या चॅनेलने शेअर केला आहे.

 खालील व्हिडिओ पहा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe