Vinfast VF3 Electric SUV:- भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढताना दिसून येत असून यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर पासून ते इलेक्ट्रिक कारपर्यंत अनेक वाहनांची निर्मिती भारतातील आणि विदेशातील आणि कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा फायदेशीर असल्यामुळे देखील ग्राहकांची पसंती आता इलेक्ट्रिक वाहनांकडे असल्याचे दिसून येत आहे.
अनेक नामवंत कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार आता भारतीय बाजारपेठेमध्ये सादर होत असतानाच विनफास्ट या कंपनीने देखील आता भारतामध्ये स्वस्तामध्ये इलेक्ट्रिक कार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले असून यासंबंधी प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही कंपनी विन फास्ट टॉप डाऊन अप्रोचसह सुरुवात करणार
असून लवकरच या कंपनीच्या माध्यमातून एक एसयूव्ही भारतीय बाजारपेठेमध्ये उतरवली जाणार आहे. हे मॉडेल विनफास्ट VF3 इलेक्ट्रिक एसयूव्ही सारखेच असणार असून एक छोटी इलेक्ट्रिक एसयूव्ही असणार आहे व ही कार एमजी कॉमेटपेक्षा मोठी आहे.
काय आहेत या कारची वैशिष्ट्ये?
VF3 ही एसयुव्ही 3114 मीमी लांबीची असून या कारला 16 इंचाचे व्हील्स म्हणजे चाके देण्यात आली असून या कारचा ग्राउंड क्लिअरन्स देखील उत्तम आहे. ही कॉम्पॅक्ट स्टाईल कार असून यामध्ये विनफास्ट मॉडेल पेक्षा एक नवीन ग्रील देखील देण्यात आले आहे.
तसेच दहा इंच च्या टचस्क्रीनसह खाली क्लाइमेट कंट्रोल बटन देण्यात आले असून या कारचा अंतर्भाग म्हणजेच इंटेरियर साधा आहे.
परंतु वैशिष्ट्यपूर्ण रीतीने बनवण्यात आलेला आहे. तसेच या VF3 ची बूट स्पेस क्षमता 550 लिटरची असून वीनफास्ट कंपनीच्या माध्यमातून अधिकृतरित्या ही कार सिंगल चार्जवर 200 किमीची रेंज देईल असा दावा देखील करण्यात आला आहे.
भारतात कोणते येणार मॉडेल?
भारतामध्ये या एसयूव्हीचे कोणते मॉडेल येणार किंवा VF3 चे मॉडेल कसे असणार याबाबत मात्र अजून देखील कमालीची गुप्तता ठेवण्यात आलेली आहे. ही कार स्वस्तात राहावी म्हणून कंपनीला यामध्ये बरेच बदल करावे लागणार असून तुमच्या माहितीसाठी सांगतो की तामिळनाडू येथे या कंपनीचा एक मोठा प्लांट असून त्या ठिकाणाहून संपूर्ण देशात ही कार वितरित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
लवकरच या कारच्या उत्पादनाला सुरुवात होण्याची शक्यता असून या कारच्या किमती बाबत मात्र अदयाप देखील कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.
परंतु जर या कारमध्ये असलेली फिचर पाहिले तर ही कार महाग असू शकते. त्यासोबतच एक बजेट मॉडेल देखील बाजारात येण्याची शक्यता असून VF3 कारची किंमत दहा लाख रुपयापेक्षा कमी असण्याची शक्यता देखील आहे.
या कारच्या लूकने अनेकांना भुरळ घातलेली असून कारची रेंज पण दमदार असल्याचे म्हटले जात आहे. विनफास्ट ही कंपनी मूळची व्हिएतनाम या देशाची आहे.