Xiaomi SU7 EV:- सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये आणि भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांनी उत्कृष्ट फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या असून प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि किंमत वेगवेगळी आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत असून
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरण हिताच्या दृष्टिकोनातून या वाहनांचे महत्त्व हे अनन्यसाधारण असल्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. जर आपण इलेक्ट्रिक कार निर्मितीमधील कंपन्यांचा विचार केला तर अनेक भारतीय कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार निर्मिती सुरू केली आहे
व त्यासोबतच आता शाओमी या कंपनीने पहिली वहिली इलेक्ट्रिक सेडान कार SU7 लॉन्च केली असून जवळपास तीन प्रकारांमध्ये ही कार लॉन्च करण्यात आली आहे. सध्या ही जगातील 29 देशांमध्ये विक्रीकरिता उपलब्ध असून एप्रिल पासून या कारची डिलिव्हरी सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
भारताच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ही कार अजून भारतात विक्रीकरिता उपलब्ध नाही. परंतु जगामध्ये या कारला चांगला प्रतिसाद ग्राहकांकडून मिळत असून लॉन्च झाल्यापासून तर आत्तापर्यंत या कारची पन्नास हजार पेक्षा अधिक बुकिंग झाल्याची माहिती समोर आलेली आहे. Xiaomi SU7 इलेक्ट्रिक कारचे डिझाईन खूप प्रीमियम असून ही दिसायला खूप आकर्षक कार आहे.
या कारने बुकिंगचा केला विक्रम
मिळालेल्या माहितीनुसार, त्या कारला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येत असून अवघ्या 27 मिनिटांमध्ये या कारचे पन्नास हजार पेक्षा जास्त बुकिंग झालेले आहेत.
इतकच नाही तर लॉन्च झाल्यानंतर अवघ्या चारच मिनिटांमध्ये दहा हजार बुकिंगचा विक्रम या कारने नोंदवला. जर आपण या कारची तुलना टेस्ला मॉडेल 3 शी केली तर या कारची किंमत टेस्लाच्या कारपेक्षा कमी असून रेंज जास्त आहे.
किती आहे या इलेक्ट्रिक कारचे रेंज?
Xiaomi SU7 दोन बॅटरी पॅकसह उपलब्ध असून यामध्ये 73.6kWh आणि 101kWh चा बॅटरी पॅक देण्यात आलेला असून यातील 73.6kWh बॅटरी पॅक असलेली कार सातशे किलोमीटर आणि 101kWh बॅटरी पॅक असलेली कार 810 किलोमीटरची रेंज देते असा दावा कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
एवढेच नाहीतर येणाऱ्या कालावधीमध्ये ही कंपनी 150kWh बॅटरी पॅक असलेली कार लॉन्च करण्याची तयारीत आहे व ही कार एका चार्ज मध्ये बाराशे किलोमीटरची रेंज देईल.
विशेष म्हणजे ही कार अल्ट्रा फास्ट चार्जिंग सह उपलब्ध असणार आहे. याबाबत कंपनी दावा करते की ही कार फक्त पंधरा मिनिट चार्ज केल्यानंतर साडेतीनशे किलोमीटर पर्यंत रेंज देईल. या कारचा विचार केला तर अवघ्या 5.28 सेकंदात 0-100 कीमी प्रति तासाचा वेग पकडते.
किती आहे या कारची किंमत?
Xioami SU7 कारची किंमत 215,900 युवान म्हणजेच भारतीय चलनात विचार केला तर 24.92 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.