यामाहाने बाजारपेठेत केला मोठा धमाका! नवी स्कूटर केली बाजारात दाखल, सुरु होण्यासाठी नाही चावीची गरज व ना चोरीचे टेन्शन

Ajay Patil
Published:
yamaha aerox 155 version scooter

भारतामध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या असून यामध्ये हिरो, होंडा तसेच सुझुकी, बजाज यासारख्या अग्रगण्य कंपन्या असून त्यासोबतच यामाहा मोटर्स ही देखील दुचाकी उत्पादनामध्ये खूप प्रसिद्ध अशी कंपनी आहे. आज देखील यामाहा कंपनीच्या दुचाकींना मोठ्या प्रमाणावर पसंती देण्यात येते.

यामाहा मोटरच्या माध्यमातून दुचाकीच नाही तर स्कूटर देखील उत्पादित केल्या जातात व त्यांना देखील ग्राहकांकडून प्रचंड मागणी असते. अगदी याच पद्धतीने भारतीय बाजारपेठेमध्ये पुन्हा एकदा यामाहाने एक नवीन स्कूटर लॉन्च केलेली आहे व त्या स्कूटरचे नाव आहे Yamaha Aerox 155 Version S असे आहे.

या नवीन सादर करण्यात आलेल्या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्मार्ट की तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून ती दोन आकर्षक रंगांमध्ये म्हणजे सिल्वर आणि रेसिंग ब्लू रंगांमध्ये सादर करण्यात आलेली आहे. तसेच यामध्ये वापरण्यात आलेले स्मार्ट की तंत्रज्ञान हे आन्सर बॅक,

ई मोबिलायझर आणि अनलॉक या वैशिष्ट्यांनी सज्ज आहे. या माध्यमातून रायडर्सला सुविधा आणि सुरक्षितता दोन्ही देता यावे हा त्याचा उद्देश आहे. कि लेस इग्निशन हा स्मार्ट की सिस्टमचा आणखी एक फायदा आहे जो चावी न वापरता स्कूटर सहजपणे सुरू करण्यासाठी मदत करतो.

 यामाहाच्या या स्कूटरचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये

ही स्कूटर चावी न वापरता तुम्हाला सहजपणे सुरू करता येते. कारण यामध्ये की लेस इग्निशन हा स्मार्ट की सिस्टमचा एक फायदा असून स्कूटर सुरू करण्यासाठी यामुळे चावीची गरज भासत नाही. तसेच ई मोबिलायझर फंक्शनसह हे फंक्शन, चावी नसताना देखील इंजिन बंद करून स्कूटर चोरीपासून संरक्षित असल्याची खात्री करते.

ई मोबिलायझर फीचर्सचा विचार केला तर बहुतांशी हे कार मध्ये आढळून येते. या फीचरमुळे स्कूटर चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची भीती कमी होते. तसेच या व्यतिरिक्त या स्कूटरमध्ये X केंद्राच्या आकृतीबंधाने हायलाईट केलेले ॲथलेटिक डिझाईन असून ते ट्रॅक्शन कंट्रोलने सुसज्ज आहे.

तसेच ही स्कूटर १५५ सीसी ब्लू कोर इंजिन द्वारे समर्थित असून जे आठ हजार आरपीएम वर पंधरा बीएचपी पावर आणि सहा हजार पाचशे आरपीएम वर 13.9 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन उच्च कार्यक्षमता आणि कार्यक्षमतेचे मिश्रण असून ते शहरांमध्ये रायडिंगसाठी योग्य आहे.

 किती आहे Yamaha Aerox 155 Version S ची किंमत?

यामाहाच्या या नवीन स्कूटरची किंमत एक लाख 50 हजार 600 रुपये( एक्स शोरूम) पासून पुढे सुरू होते व हे केवळ ब्लू स्क्वेअर शोरूम मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe