Edible Oil Prices :- दिवाळी म्हटले म्हणजे प्रत्येक घरामध्ये फरसाण तसेच चकल्या, शंकरपाळे इत्यादी सारखे तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात व या कालावधीमध्ये खाद्यतेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो.
मागच्या वर्षी दिवाळीच्या कालावधीमध्ये खाद्य तेलाचे दर हे गगनाला पोहोचलेले होते. तब्बल 150 ते 170 रुपये किलो पर्यंत सोयाबीन तेल मिळत होते. त्यामुळे मागच्या वर्षी गृहिणींचे बजेट मात्र विस्कटले होते.
परंतु यावर्षी मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्यामुळे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून खाद्य तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर केली गेल्यामुळे टप्प्याटप्प्याने खाद्यतेलाच्या दरामध्ये घट होत गेली.
जर आपण मागच्या वर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत यावर्षीचा विचार केला तर सूर्यफूल, पाम तसेच सोयाबीन व सरकी तेलाच्या दरामध्ये तब्बल 30 ते 35 टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या जर आपण सरकी किंवा सूर्यफूल तसेच सोयाबीन तेलाचे एक किलोचे दर पाहिले तर किरकोळ बाजारामध्ये शंभर रुपये पर्यंत आहेत.
खाद्यतेलाचे दर घटण्यामागील प्रमुख कारणे
खाद्यतेलाचे दर घटण्यामागे प्रमुख कारण जर पाहिले तर रशिया आणि युक्रेन मधून सूर्यफूल तेलाची आवक आपल्याकडे होत असते. मागच्या वर्षी खाद्यतेलाच्या बाजारभावात मोठी वाढ झाली होती.
त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील प्रमुख तेल आयातदारांना वीस लाख टन तेलाच्या आयातीवर आयात शुल्क माफ करण्यात आले होते. आयात शुल्क माफ केल्यामुळे तेल दरात घट झाली व जागतिक बाजारपेठेतून खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली असे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहे.
सूर्यफूल तसेच सोयाबीन व करडई तेलाच्या तुलनेत मात्र शेंगदाणा तेलाचे दर टिकून असून ते 220 ते 270 रुपये प्रति किलोच्या दरम्यान आहेत.
सध्या काय आहेत तेलाचे दर
( पंधरा किलोचे दर)
1- पाम तेल- 1350 ते 1500 रुपये
2- सूर्यफूल तेल- चौदाशे रुपये ते पंधराशे रुपये
3- सोयाबीन तेल- चौदाशे रुपये ते पंधराशे रुपये
4- सरकी तेल- चौदाशे रुपये ते 1550 रुपये
5- वनस्पती तूप- चौदाशे ते सोळाशे रुपये
6- शेंगदाणा तेल- 2700 ते 2800 रुपये
(हे दर 15 किलोचे आहेत)
तेलाच्या दरात मागच्या वर्षीच्या तुलनेत 15 किलोमागे साधारणपणे सातशे ते आठशे रुपयाची घट झाल्यामुळे नक्कीच दिवाळीच्या तोंडावर नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल हे मात्र निश्चित.