Cotton Rate : यंदा मंगलम होणार..! कापूस आणि सोयाबीन पीक करणार शेतकऱ्यांना मालामाल, मिळणार ‘इतका’ बाजारभाव ; डिटेल्स वाचा

Published on -

Cotton Rate : महाराष्ट्रात कापसाची आणि सोयाबीनची लागवड (Soybean Farming) विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव खरीप हंगामात या दोन मुख्य पिकांची शेती (Farming) करत असतात. गतवर्षी कापसाला तसेच सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजार भाव (Soybean Rate) मिळाला असल्याने या वर्षी कापसाच्या (Cotton Crop) तसेच सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्रात थोडीशी वाढ झाली असावी असा तज्ञांचा अंदाज आहे.

मात्र असे असले तरी खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे कापूस तसेच सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. यावर्षी सुरुवातीला मान्सून हा उशिरा आला. मोसमी पावसाला उशीर झाला असल्याने याचा सर्वाधिक फटका कापूस पिकाला बसला आहे.

या शिवाय मध्यंतरी जुलै आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे सोयाबीन पीक पूर्णतः प्रभावित झाले असून अतिवृष्टी सारख्या पावसामुळे सोयाबीन पिकावर मुळकुज तसेच मर रोगाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादनात देखील घट होणार आहे.

अशा परिस्थितीत या वर्षी सोयाबीन तसेच कापसाला काय बाजार भाव मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यामुळे आज आपण या वर्षी कापसाला तसेच सोयाबीन पिकाला (Soybean Crop) किती बाजार भाव मिळू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत.

कापसाला किती मिळणार बाजार भाव?

मित्रांनो गेल्या वर्षी कापसाला कधी नव्हे तो उच्चांकी बाजार भाव मिळाला होता. यामुळे या वर्षी कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात या वर्षी तीन लाख हेक्‍टरने वाढ झाली आहे. एका आकडेवारीनुसार या वर्षी संपूर्ण देशात 42 लाख 29 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड (Cotton Farming) करण्यात आली आहे.

मात्र असे असले तरी सध्या कापसाला चांगला बाजारभाव मिळत आहे. याशिवाय या वर्षी मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस उशिरा आला असल्याने कापसाच्या पेरण्या उशीर झाल्या आहेत. अशा परिस्थितीत यावर्षी कापसाचे उत्पादन बाजारात उशिरा दाखल होणार आहे. यामुळे बाजारपेठेत कापसाची आवक कमी राहणार असून याचा परिणाम कापसाच्या बाजारभाव वर होणार आहे.

जाणकार लोकांच्या मते आवक कमी राहिल्यास कापसाला चांगला बाजारभाव मिळू शकतो. लांब धाग्याच्या कापसाला यावर्षी सहा हजार आठशे रुपये एवढा हमीभाव लावून देण्यात आला आहे. मात्र या वर्षी कापसाला यापेक्षा अधिक बाजार भाव मिळणार आहे. तज्ञांच्या मते कापसाला यंदा आठ हजार ते साडे आठ हजार रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.

सोयाबीनला किती मिळणार बाजार भाव?

मित्रांनो या वर्षी देशात मुबलक प्रमाणात सोयाबीनचा साठा शिल्लक आहे. मात्र मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबिनच्या उत्पादनात घट होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत देशात सोयाबीनचा साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक असला तरीदेखील उत्पादनात घट झाल्यास देशांतर्गत सोयाबीनचा शॉर्टेज निर्माण होण्याची शक्यता आहे.

असं झाल्यास या वर्षी सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळणार आहे. तज्ञांच्या मते या वर्षी सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक बाजार भाव मिळणार आहे. साहजिकचं या वर्षी सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव नसणार आहे. यावर्षी सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव केंद्र शासनाने लावून दिला आहे. निश्चितचं या वर्षी हमी भावापेक्षा अधिक बाजार भाव मिळणार असला तरीदेखील गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीनच्या दरात थोडीशी घसरण पाहायला मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe