Soybean Bajarbhav : सोयाबीन बाजारभावाला लागलं ग्रहण…! आवक कमी असूनही सोयाबीनच्या दरात घसरण, नेमकं सोयाबीन बाजारात सुरू तरी काय, वाचा

Ajay Patil
Published:
Soyabean Production

Soybean Bajarbhav : राज्यात सोयाबीन (Soybean Crop) हे एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या नगदी पिकाच्या बाजार भावाला ग्रहण लागले आहे. मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचा बाजारभावात (Soybean Market Price) सातत्याने घसरण बघायला मिळत आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वी उमरखेड डांकी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला होता. मात्र त्या दिवसापासून आज पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Rate) जवळपास 700 ते 800 रुपयाची घसरण बघायला मिळत नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Soybean Grower Farmer) मनात सोयाबीन बाजारभावाविषयी मोठी संभ्रमावस्था बनली आहे.

दरम्यान आज रविवार असल्याने राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Apmc) आज व्यवहार बंद असतात. मात्र राज्यात उदगीर आणि औरंगाबाद मधील सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती रविवारी देखील सोयाबीन लिलाव घेत असते.

उदगीर या ठिकाणी झालेल्या लिलावाची महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आलेली नसली तरीदेखील सिल्लोड एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावाची माहिती महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. त्यानुसार सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या दराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो सिल्लोड मध्ये आज 12 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून पाच हजार तीनशे रुपये एवढा कमाल भाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीन ला मिळाला आहे. सर्वसाधारण बाजार भाव देखील आज पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सिल्लोड एपीएमसीमध्ये राहिला आहे.

एकंदरीत, गेल्या महिन्याभरापूर्वी सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होणारा सोयाबीन आज पाच हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल वर येऊन ठेपला आहे. यामुळे आगामी काळात सोयाबीन बाजारात सोयाबीनला कसा दर मिळेल? तसेच नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाल्यानंतर सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होईल का?

यांसारखे अनेक प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या मनात घर करून बसले आहेत. सद्यस्थितीला सोयाबीनची आवक कमी असताना देखील बाजारभावात घसरण होत आहे यामुळे आगामी काळात सोयाबीन बाजारभाव कसा राहील याकडे शेतकरी बांधव मोठ्या उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe