Soybean Market News : सोयाबीन उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता यावर्षी सुरुवातीपासूनच सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत. गेल्या वर्षी विक्रमी दर मिळाला असल्याने यावर्षी देखील सोयाबीनला चांगला विक्रमी बाजारभाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.
मात्र तसं काही झालं नाही, गेल्या वर्षी 7000 रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर सोयाबीनला मिळत होता. सध्या मात्र सोयाबीनला पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. म्हणजे जवळपास गेल्या वर्षीपेक्षा 2 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास कमी दर मिळत आहे.
दरम्यान जागतिक बाजारातून उत्पादक शेतकऱ्यांसाठी या आठवड्यात एक सकारात्मक चेंज झाला आहे. संपूर्ण आठवडाभर सोयाबीन दरात चढ-उतार होते मात्र शेवटी दरात मजबुती आली आहे. मात्र देशांतर्गत बाजार स्थिर होते. परंतु यामध्ये आता बदल होणार असून पुढील हप्त्यापासून देशांतर्गत दरात वाढ होणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढ होण्याचे कारण
जागतिक बाजारात या आठवड्यात सोयाबीन दरात वाढ झाली. जाणकार लोकांच्या मते, प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र अर्जेंटीनामध्ये दुष्काळ पडण्याचे चिन्हे आहेत तसेच चीनकडून मागणी वाढण्याची शक्यता देखील आहे यामुळे जागतिक बाजारात दरात वाढ झाली आहे.
याशिवाय अजून एक मुख्य कारण म्हणजे खाद्यतेलाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वधारले आहेत यामुळे याचाही कुठे ना कुठे सोयाबीन दराला आधार मिळत आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, जागतिक बाजारात या आठवड्यात 4550 ने सोयाबीनचा सौदे सुरू झालेत आणि 4670 वर बंद झालेत.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अर्थातच 120 रुपयांची घसघशीत वाढ सोयाबीन मध्ये पाहायला मिळाली. मात्र याचा फारसा परिणाम देशांतर्गत बाजारात पाहायला मिळाला नाही. दरम्यान आता जाणकार लोकांनी जानेवारी महिन्यात भाव वाढीचे संकेत दिले आहेत. खरं पाहता 4 जानेवारी पर्यंत जागतिक बाजारात अनेक ठिकाणी व्यवहार बंद राहणार आहेत.
मात्र तदनंतर भारतीय सोयाबीन आणि सोयापेंडच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास देशांतर्गत सोयाबीन दरात वाढ होऊ शकते असं काही तज्ञांनी नमूद केल आहे. निश्चितच नववर्षात सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र तयार झाले आहे.