Soybean Market Price: सोयाबीन विकताय का? मग थांबा! सोयाबीनचे आजचे बाजारभाव जाणून घ्या, मग विक्रीच नियोजन आखा

Published on -

Soybean Market Price: सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील (Kharif Season) मुख्य पीक असून याची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती (Soybean Farming) केली जाते. अशा परिस्थितीत सोयाबीनच्या बाजारभावकडे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे (Farmer) लक्ष लागून असते.

आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीनचे बाजार भावाची (Soybean Rate) रोजच माहिती घेऊन येत असतो. आज देखील आपण सोयाबीनचे आजचे बाजार भाव जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता सोयाबीन पिकाचे 19 ऑगस्ट 2022 चे बाजार भाव जाणून घेऊया.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 2000 क्विंटल आवक नमूद करण्यात आली आहे. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त 6040 रुपये प्रतिक्‍विंटल एवढा बाजार भाव मिळाला, तर कमीत कमी बाजार भाव 5740 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. आज या एपीएमसीमध्ये सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती:- अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 2748 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत आज सोयाबीनला कमीत कमी पाच हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार एक रुपये प्रति क्विंटल एवढा होता. सर्वसाधारण बाजार भाव 5850 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 198 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. बाजार समितीचा सोयाबीनला पाच हजार 300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजारभाव मिळाला असून जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा होता. आज सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 862 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज या बाजार समिती 380 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली असून कमीत कमी बाजार भाव 5 हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे. आज या बाजारात जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार 130 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 865 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज या बाजार समितीत 820 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली असून कमीत कमी बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे. तसेच जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार 100 आणि सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती:- लासलगाव एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 181 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी बाजार भाव 5 हजार 801 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. जास्तीत जास्त बाजार भाव आजचे एपीएमसीमध्ये 6095 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला असून सर्वसाधारण बाजार भाव 6051 एवढा होता.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती:- यवतमाळमध्ये आज 185 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली असून कमीत कमी बाजार भाव 5700 एवढा नमूद करण्यात आला आहे तसेच जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा होता आणि सर्वसाधारण बाजार भाव 5850 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज वाशिम एपीएमसीमध्ये एकूण तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सोयाबीनला कमीत कमी साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe