Soybean Market Price : गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सातत्याने चढ उतार बघायला मिळत आहे. काल सोयाबीन (Soybean Crop) सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला होता. मात्र सोयाबीनच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण बघायला मिळत आहे.
त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव (Soybean Grower Farmer) संभ्रमावस्थेत बघायला मिळत आहेत. मित्रांनो खरं पाहता गेल्या महिनाभरापूर्वी सोयाबीनला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळत होता. मात्र तदनंतर सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Bajarbhav) सातत्याने घसरण बघायला मिळाली आहे.
काल अचानक सोयाबीनच्या दरात थोडीशी वाढ झाली होती. घनसावंगी एपीएमसीमध्ये काल सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला होता. यामुळे राज्यातील तमाम सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा सोयाबीनचे दर कमी झाले असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव कमालीचे संभ्रमावस्थेत बघायला मिळत आहेत.
मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी आगात सोयाबीनची पेरणी केली होती त्यांचा नवीन सोयाबीन आता बाजारात हळूहळू दाखल देखील होऊ लागला आहे. मात्र अद्यापही सोयाबीनच्या दरात सुधारणा होत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. मित्रांनो आगामी काही दिवसात सोयाबीनचा प्रत्यक्ष हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होते की नाही हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीनचे नवीन बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Apmc) सोयाबीनला मिळालेल्या बाजार भावाविषयी विस्तृत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला आज मिळालेले बाजार भाव.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मित्रांनो आज नागपूर एपीएमसीमध्ये 289 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज नागपूर एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला चार हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5351 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज नागपूर येथे नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 110 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज हिंगोली एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 280 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात हिंगोली एपीएमसीमध्ये पाच हजार 140 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.
निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या निफाड एपीएमसीमध्ये आज 52 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात निफाड एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 291 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 431 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज निफाड येथे झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार 423 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 542 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात अकोला एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 375 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल 5000 भाव मिळाला आहे. तसेच आज अकोला एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार 180 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये आज 79 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात यवतमाळ एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 340 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज यवतमाळ एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार 70 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज चिखली एपीएमसीमध्ये 395 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात चिखली एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4701 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5151 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज चिकणी एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 4916 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.