Soybean Market Price : सोयाबीन आज पण मातीमोल…! सोयाबीन दर महिन्याभरातील सर्वात निचांकी पातळीवर, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Production

Soybean Market Price : शेतकऱ्यांवर (Farmer) गेल्या काही वर्षांपासून संकटांची मालिका कायम आहे. शेतकरी बांधवांना हवामान बदलामुळे (Climate Change) तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे कायमच संकटांचा सामना करावा लागतो.

सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना (Soybean Grower Farmer) देखील शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे राज्यात सोयाबीनची लागवड (Soybean Farming) विशेष उल्लेखनीय असून राज्यातील अनेक शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या मुख्य पिकावर अवलंबून आहे.

अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांना सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) होणाऱ्या घसरणीमुळे मोठ आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मित्रांनो खरे पाहता गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.

आजदेखील सोयाबीन बाजारात सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासचं बघायला मिळाला. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव भविष्यात सोयाबीनचे दर कसे असतील याबाबत मोठ्या संभ्रमावस्थेत सापडला आहे. मित्रांनो आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला मिळालेल्या बाजार भावाविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सोयाबीनला मिळालेला बाजारभाव.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती : कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 1800 क्विंटल आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये 5255 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन ला मिळाला असून चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीन ला मिळाला आहे. तसेच 5075 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज सोयाबीनला मिळाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 1941 क्विंटल आवक नमूद करण्यात आली आहे. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 135 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव आज या एपीएमसी मध्ये सोयाबीन ला मिळाला आहे. तसेच चार हजार 917 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज सोयाबीन ला या ठिकाणी मिळाला.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसीमध्ये आज 2455 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आहे. या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 464 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव आज मिळाला असून पाच हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार 350 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज एपीएमसी मध्ये नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती:- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 692 क्विंटल आवक नमूद करण्यात आले आहे. या एपीएमसीमध्ये पाच हजार 225 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन ला मिळाला असून साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीन मिळाला आहे. तसेच पाच हजार 190 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज एपीएमसी.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- वाशिम एपीएमसी मध्ये 1500 क्विंटल सोयाबीनची आवक आज नमूद करण्यात आली. अध्याय एपीएमसीमध्ये पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसी मध्ये नमूद करण्यात आला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती:- या बाजारात आज 320 क्विंटल आवक करण्यात आली आहे. पाच हजार 160 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव आजचे एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला असून 4400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे. तसेच 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe