Soybean Market Price : धक्कादायक! सोयाबीनच्या दरात पुन्हा 500 रुपयाची घसरण! आजचे बाजारभाव जाणून घ्या

soyabean market

Soybean Market Price : राज्यात सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) पडझड सुरूच आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) बांधव संभ्रमावस्थेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात सहा हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने विक्री होणारा सोयाबीन (Soybean Crop) आज साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलवर येऊन ठेपला आहे. मित्रांनो, राज्यात सोयाबीन लागवडीखालील (Soybean Farming) क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crops) अवलंबून आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी कायमच सोयाबीनच्या बाजारभावाकडे लक्ष ठेवून असतात. म्हणून आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच सोयाबीनचे ताज्या बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो. अशा परिस्थितीत आज आपण 30 ऑगस्ट 2022 रोजीचे सोयाबीन बाजारभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 3500 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 525 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला असून किमान बाजार भाव 5 हजार 125 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 325 रुपये प्रति क्विंटल एवढा आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती

अमरावती एपीएमसीमध्ये आज 2970 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत आज पाच हजार 377 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमाल बाजार भाव मिळाला असून किमान बाजार भाव पाच हजार पन्नास रुपये नमूद करण्यात आला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 213 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती

नागपूर एपीएमसीमध्ये आज 181 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये पाच हजार 425 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून किमान बाजार भाव चार हजार 825रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच आज सोयाबीनला पाच हजार 281 रुपये एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

अकोला एपीएमसीमध्ये आज 1180 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसी मध्ये सोयाबीन ला 5,530 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती

यवतमाळ एपीएमसीमध्ये 367 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमाल बाजार भाव मिळाला असून 4880 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती

या एपीएमसीमध्ये 1815 क्विंटल सोयाबीनची आज आज आवक झाली आहे. या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 480 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव आज मिळाला असून पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच 5305 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला आज या एपीएमसीमध्ये मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe