अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला

Ahmednagarlive24
Published:

कर्जत : तालुक्यातील जलालपूर शिवारात एका अज्ञात तरूणाचे प्रेत शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून दोन दिवसांपूर्वी या व्यक्तीचा खून करून त्याचे प्रेत या ठिकाणी आणून टाकले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे याचा पोलिस तपास करत आहेत.जलालपुर गावच्या शिवारात नवनाथ आत्माराम बाबर यांच्या शेतातील बाजरीच्या पिकात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला.

गुरुवारी दि.२९ रोजी रात्री ११ वा. याबाबत कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जलालपूरचे पोलीस पाटील अण्णा गणपत सांगळे यांनी फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर मयत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ असुन अंगात लाल रंगाचा चौकटयाचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पँट आहे.

या मयत युवकाच्या उजव्या हातावर एकनाथ असे इंग्रजी अक्षरे गोंधलेली आहेत. तर हातात दोन राख्या बांधलेल्या आहेत. सदर व्यक्तीचा चेहरा पूर्ण काळा पडलेला होता व रक्ताने माखलेला होता. डोक्याच्या मागच्या बाजूस मार लागलेला असून कर्जत येथील उप जिल्हा रुग्णालय येथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment