वीज पडुन ११ शेळ्या मृत्युमुखी या तालुक्यातील घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील वारणवाडी ता.पारनेर येथे दि.23 जुलै रोजी मध्ये शेळ्या चारत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यात वीज पडून ११शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.

या नैसर्गिक आपत्तीमध्ये मेंढपाळ पोपट हांडे यांचे जवळपास अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामा करण्यात आला आहे.

दि .२३जुलै रोजी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणवाडी येथेल हांडेवाडा परिसरात शेळ्या चारायला गेल्या असता मेंढपाळ पोपट कोंडीबा हांडे हे रानामध्ये शेळ्या चारत असताना

अचानक पाऊस व वारे सुरू झाले त्यातच शेळ्यांच्या अंगावर वीज पडून या ११ शेळ्या जागीच दगावल्या आहेत. या झालेल्या नुसकानीचा पंचनामा करण्यात आला.

वीज पडून शेळ्या मृत्युमुखी पडल्यामुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुसकान झाले आहे त्याला शासकीय पातळीवरून मदत मिळावी अशी मागणी परिसरात व्यक्त होत आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News