अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या शहरातील २८ पैकी १४ रुग्णालयांनी शासन निर्धारित दरापेक्षा ४५ लाख २८ हजारांचे अतिरिक्त बिल आकारल्याची बाब समोर आली.
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या बिलांची मंगळवारपासून तपासणी सुरू केली. दिवसभरात ४५ बिलांवर निर्णय घेऊन अंतिम आदेशासाठी बुधवारी ती जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवली जाणार आहेत.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत करण्यात येणारे उपचार व योजनेचा दिलेला लाभ, तसेच एक लाखापेक्षा जास्त बिलांची तपासणी केली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या पथकांनी आतापर्यंत २८७ बिलांची तपासणी केली असून त्यापैकी १५० बिलांत त्रुटी आढळल्या. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा १४ रुग्णालयांनी तब्बल ४५ लाख २८ हजार ६८० रूपये जास्त आकारले असून
ते वसुलीस पात्र असल्याचा अहवाल उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या समितीसमोर आला. संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे मागवून घेण्यात आले.
पथकांनी दिलेल्या अहवालावर चर्चा करून ४५ बिलांप्रकरणी निर्णय समितीने घेतला. किती रक्कम वसुलीस पात्र आहे, हे सध्यातरी गुलदस्त्यात असून जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी अंतिम आदेश देतील.
या निकषांची तपासणी निर्धारित शासकीय दरांचा फलक लावला आहे का? एक लाखापेक्षा जास्त बिले आकारली आहेत का? निश्चित होणाऱ्या वसुलीस पात्र बिलांची रक्कम अदा करण्याबाबत रूग्णालयांना कळवणे,
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई आदी बाबींवर समिती निर्णय घेईल. समितीसमोर १०० बिले समितीसमोर आलेल्या
१०० बिलांपैकी ४५ बिलांची मंगळवारी जुन्या महापालिकेत समितीने तपासणी केली. उर्वरित बिलांचीही तपासणी सुरू आहे. तपासलेल्या ४५ बिलांचा अहवाल बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवणार आहोत. अंतिम आदेश जिल्हाधिकारी देतील.” पल्लवी निर्मळ, उपजिल्हाधिकारी, समिती अध्यक्ष.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved