अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील गुंजाळवाडी पठार येथे शेततळ्यात पडून एका बावीस वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना गुरूवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे धनंजय दादाभाऊ आगलावे असे या तरूणाचे नाव आहे.
दादाभाऊ गोपीनाथ आगलावे हे शेतकरी गुंजाळवाडी पठार येथे राहात आहे त्यांना दोन मुले आहे .घराच्या पाठीमागेच त्यांचे मोठे शेततळे आहे गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुलगा धनंजय हा गायांना पाणी पाजायचे म्हणून घरी आईला सांगून बादली घेवून तो शेततळ्यावर गेला होता.

आणी शेततळ्यातून बादलीने पाणी काढत असताना त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला व तो शेततळ्यात पडला मात्र धनंजय याला पोहता येत नसल्याने शेततळ्यातील पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .
सीताराम वाळुंज यांनी शेततळ्याच्या दिशेने धाव घेतली आरड ओरड केला असता इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर धनंजय याचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढला .
पोलिस पाटील शिवप्रसाद दिवेकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस हेडकाॅन्सटेबल आदिनाथ गांधले हे करत आहे धनंजय याच्या मृत्यूने गुंजाळवाडी पठार सह कर्जुले पठार गावावर शोककळा पसरली असून सगळ्यांनी हळ हळ व्यक्त केली आहे
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved