अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-आज दुपारी पाथर्डी-बीड या रोडवर मोहटादेवी गडाकडे जाणार्या फाट्याजवळ एका रिक्षाला अपघात झाला. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले आहेत.
त्यांना उपचारासाठी पाथर्डी येथे दाखल करण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील मोहटा गावातील चार ते पाच जण एका रिक्षामधून पाथर्डीकडे चालले होते.
त्यातच या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या दरम्यान रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा मोहटादेवी फाट्याजवळ पलटी झाली.
या अपघातात रिक्षातील सर्वजण किरकोळ जखमी झाले. यापैकी तीन जणांच्या डोक्याला मार लागला असून त्यांना पाथर्डी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघात झाल्याची माहिती कळताच मोहटा देवस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्तांना तातडीने पाथर्डी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा