अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-शेवगाव तालुका शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आज राहुरी येथे राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. नगर-औरंगाबाद रोड वडाळा बहिरोबा गावा नजीक हा अपघात झाला होता.दरम्यान हि घटना काल (दि.26 ऑक्टोबर) रोजी घडली होती.
दरम्यान या अपघातात गाडीतील कार्यकर्त्यांना मुका मार लागला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेवगाव तालुक्यातील शिष्टमंडळ अमरापुर, फलकेवाडी, भगूर या भागातील शेतकर्यांना घेऊन ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे भेटीसाठी काल राहुरी येथे गेले होते.
मंत्री महोदयांची भेट घेत पार्टीच्या प्रवासाला निघालेले शिष्टमंडळ हे नेवासाच्या दिशेने येत असताना, नगर-औरंगाबाद या महामार्गावर वडाळा बहिरोबा नजीक त्यांचे वाहनाला पाठीमागून येणार्या आयशर ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेने चारचाकी वाहाण रस्त्यावरून रस्ता दुभाजकावर जाऊन आडकली.
त्यात संघटनेच्या पदाधिकार्यांना मुका मार बसला. या अपघातात कार्यकर्त्यांना मुका मार बसला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने सर्व कार्यकर्ते या अपघातातून बालंबाल बचावले. नेवाशाचे सामाजिक कार्यकर्ते जयवंत मोटे यांनी त्यांना तत्काळ शेजारील रुग्णालयामध्ये आणल्यानंतर उपचार करुन सोडण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते अंबादास कोरडे यांनी यावेळी सर्वांना धीर दिला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved