अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारची जाहिरात बाजी न करता कोरोना काळात रक्तदानासह सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा असे आव्हान केले होते.
या आवाहनाला पारनेर तालुका शिवसैनिकांनी एक पाऊल पुढे टाकुन शिवसेना पदाअधिका-यांनी स्वतः ता पैसे जमा करून उद्यावत कोव्हिड सेंटर चालु केले
हा एक उत्तम पायंडा पाडला याचे अनुकरण भविष्यात महाराष्ट्र निश्चित पणे करेल असे मत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी व्यक्त केले आहे .
शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने पारनेर मध्ये ५० बेडचे कोव्हिड रुग्णालयाचे लोकार्पण शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ
कोरगावकर व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विधानसभा माजी उपाध्यक्ष विजयराव औटी, उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले,
प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार देवरे, बांधकाम समिती चे सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, तालुकाप्रमुख विकास रोहकले, युवानेते अनिकेत औटी,
अशोक कटारिया, राहुल शिंदे, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, पं.स.सदस्य दिनेश बाबर, उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट, नगरसेवक मुदस्सर सय्यद, नगरसेवक किसन गंधाडे, आनंदा औटी,
साहेबराव देशमाने व युवासेनेचे तालुकाध्यक्ष नितीन शेळके, संतोष येवले, पैलवान युवराज पठारे, डॉ. राजेश भनगडे, शहरप्रमुख निलेश खोडदे आदि उपस्थिती होते
यावेळी पुढे बोलताना माजी आ. औटी म्हणाले की प्रशासनाचा चालवण्याचा कुठलाही अनुभव नसतानाही राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गेली सहा ते सात महिने झाली
कोरोना काळात ची कामगिरी केली या कामाची दखल अनेक जगातल्या अनेक राष्ट्रप्रमुखांनी घेतली आहे. शिवसेनेचा जन्म हा ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणासाठी झालेला आहे.
कोव्हिड सेंटर चालु करण्यासाठी २० लक्ष रूपये शिवसैनिकांनी निधी उपलब्ध केला यामुळे प्रथमच ऑक्सिजन सोयीसुविधा सह अद्ययावत कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा