अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा रुग्णालयात कोरोनाचा आणखी एक बळी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : संगमनेर तालुक्यातील कासारवाडी येथील 63 वर्षीय इसमाचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला.

आता पर्यंत संगमनेर शहरात 8, धांदरफळ 1, निमोण 2, कौठेकमळेश्वर 1, डिग्रस 1, कासारादुमाला येथील एक 63 वर्षीय वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या 14 झाली आहे.

कासारादुमाला येथे कोरोनाने बळी गेलेली व्यक्ती ही दुधाचा व्यवसाय करीत होती. सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यावर त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.त्यांची परिस्थिती गंभीर होत गेली. अखेर त्यांचा मृत्यू झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment