अहमदनगर ब्रेकिंग : या हॉटेलजवळ आढळला मृतदेह !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यात वडगावपान शिवारातील हॉटेल रानवारा जवळ झोपलेल्या स्थितीत भाऊसाहेब खंडेराव गडगे, (वय ३७ रा. बडगावपान) हा इसम आढळून आला.

तो पूर्ण शुद्धीत नसल्याने त्याला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तो उपचारपूर्वीच मयत झालेला होता समजलेल्या माहितीनुसार मयत भाऊसाहेब गडगे याला दारु पिण्याचे व्यसन होते.

त्याच्या तोंडाचा उदग्र बास येत होता. तशी खबर सुभाष खंडेराज गडगे यांनी दिल्यावरुन संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान भाऊसाहेब गडगे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा पुढील तपास पोना. दातीर हे करीत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment