अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : आषाढी एकादशीला पायी पालखी सोहळ्याने प्रत्यक्ष शरीराने दर्शनाला जाऊ शकत नसतो, तरी अंतकरणात तळमळ असल्याने त्यांना चिंतनात ही प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ मिळतो,
असा उपदेश महंत रामगिरी महाराज यांनी श्रीक्षेत्र सरला बेट ते पंढरपुर पारंपारिक पद्धतीने सद्गुरू गंगागिरी महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान प्रसंगी केला.
आज सोमवार दि.१५ जून रोजी ज्येष्ठ वद्य दशमीला पारंपारिक पद्धतीने श्रीक्षेत्र सरला बेट येथून सद्गुरू गंगागिरी महाराज पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले.
यावेळी कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत हे प्रस्थान करण्यात आले. सद्गुरू गंगागिरी महाराज , ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज समाधी मंदिरास प्रदक्षिणा घालून पालखी १ जुलै पर्यंत पंधरा दिवस परंपरेप्रमाणे बेटावरच मुक्कामी ठेवण्यात येणार आहे.
या प्रस्तान सोहळ्याप्रसंगी भाविकांना उद्देश करताना महाराज पुढे म्हणाले की, सरकार जे नियम करत आहे, ते आपल्या समाजासाठी करत आहे. कोरोना महामारी संक्रमण होऊ नये म्हणून सर्व आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यास बंदी घालण्यात आली आहे.
पंढरपूरला आपल्या मालकीचा मठ असूनही मालक म्हणून आपल्याला तिथे जाण्यास परवानगी नाही.कारण दोन महिन्यापूर्वी शासनाने मठ ताब्यात घेतला आहे.
आषाढी एकादशीला भक्त भेटायला यावा म्हणून पांडुरंग परमात्मा वाट पाहत असतो.अध्यात्मात मानस पुजेलाही महत्त्वाचे स्थान असते, प्रत्यक्ष गेलो नाही तर घरी बसून मानस पूजेत पायी वारीचे चंद्रभागेच्या स्नानाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून पांडुरंगाचे दर्शन घेऊन संतुष्ट व्हावे, असे शेवटी रामगिरी महाराज म्हणाले.
या प्रस्थान सोहळ्याप्रसंगी शिष्यगण विद्यार्थी यांचा समावेश होता. यावेळी सरला बेटचे विश्वस्त मधुकर महाराज,नवनाथ महाराज म्हस्के,बाळासाहेब महाराज रंजाळे संदीप महाराज ,
मारुती महाराज गुंजाळ, चंदू महाराज, अमोल महाराज, भगवान महाराज डमाळे संदीप जाधव महाराज, गोविंद महाराज मलिक, सोमनाथ परमेश्वर, मधुसूदन महाराज यासह आदी कळस महिला चोपदार झेंडेकरी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews